इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी,
रविवार, ३० ऑगस्ट २६
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
इंदापूर पतंजली योग समितीच्या वतीने इंदापूर येथील प्राथमिक शाळा क्र. १ व २ येथे रक्षाबंधन सोहळा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यातून योग, आरोग्य, भारतीय संस्कृती, सामाजिक बंधुभाव आणि निसर्गसंवर्धनाचा संकल्प संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगसाधना, प्राणायाम व ध्यानधारणेने झाली. महिला योगसाधकांनी सर्व साधक व शिक्षकांना योग रक्षासूत्र बांधून उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त प्राचार्य भीमराव वणवे म्हणाले, योग, प्राणायाम ही सुखी व दीर्घायुषी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन योगाभ्यासातून शरीराचे आणि संस्कारातून मनाचे रक्षण, संवर्धन होऊन मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती राहते.
भारत स्वाभिमानाचे तहसील प्रभारी जयकुमार शिंदे म्हणाले, सन आणि उत्सव ही भारतीय संस्कृतीची चैतन्यप्रतिके असून रक्षाबंधन हा बहीण -भावाच्या नात्यापुरता मर्यादित सण नसून तो समाज, आरोग्य आणि निसर्ग रक्षणाचा संकल्प करण्याचा पवित्र महोत्सव आहे.
या प्रसंगी पतंजली योग समितीचे प्रमुख अशोक अनपट, गोपीचंद गलांडे, चंद्रकांत देवकर, खुशाल कोकाटे, हमीद आतार, राजेंद्र चव्हाण, रामेश्वर साठे, रवींद्र परबत, महिला योग समितीच्या प्रमुख सायराभाभी आत्तार यांच्यासह बहुसंख्य योगसाधक उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा