Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

*साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुस्तक व पेन देऊन गौरव करण्यात आला.



कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.


यावेळी कु. तेजस्विनी उमा संतोष मंडलिक (सोलापूर विद्यापीठात इंग्रजी विषयात सुवर्णपदक प्राप्त), ॲड. मधुरा अलका भिष्माचार्य चांदणे (B.A., LL.B. इंग्रजी – करमाळा तालुक्यातील *समाजातील* एकमेव महिला विधीज्ञ), कु. अमृता कविता भाऊसाहेब आरणे (B.A. मध्ये A+ श्रेणी व M.A.-I मध्ये शैक्षणिक यश), चि. प्रथमेश अमोल खंडाळे (B.Pharm पदवी), चि. संस्कार सोनाली ज्ञानेश्वर ढावरे (SSC परीक्षेत ८०.६० टक्के गुण व ARTI मार्फत NEET तयारीसाठी पुणे येथे निवड), कु. प्रियांका छाया दादा पवार (SSC परीक्षेत ८६ टक्के गुण) तसेच चि. संभव शंकर पवार (इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिष्माचार्य चांदणे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. गणेश भाऊ करे-पाटील (यश कल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा) उपस्थित होते. व्यासपीठावर दादाराव लोंढे (माजी नगरसेवक, करमाळा), बाबासाहेब (दादा) गायकवाड (माजी नायब तहसीलदार), डॉ. ज्ञानदेव केमकर, श्रीकृष्ण अडसूळ सर, ॲड. सचिन दादाराम लोंढे, सौ. सुवर्णा रोहिदास आलाट (नगरसेविका) तसेच बबन आरणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


यावेळी सत्कारमूर्ती विद्यार्थी मधुरा चांदणे, तेजस्विनी मंडलिक, प्रियांका पवार आणि प्रथमेश खंडाळे यांनी मनोगत व्यक्त करताना या सन्मानामुळे अधिक प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. भविष्यात उच्च पदावर अधिकारी होऊन समाजसेवा करण्याचा दृढ आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला


प्रमुख पाहुणे मा. गणेश भाऊ करे-पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून आयोजकांचे तसेच उपस्थितांचे अभिनंदन केले. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी साधन असून त्याद्वारे समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच क्रांतिज्योती मुक्ता साळवे यांच्या विचारांचा उल्लेख करत, "आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला शिक्षणाची संधी द्या," हा त्यांचा संदेश आजही समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे नमूद केले.


माजी नायब तहसीलदार बाबासाहेब (दादा) गायकवाड यांनी विद्यार्थी व पालकांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनण्याचे, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे आणि उच्च ध्येय ठेवून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.


अध्यक्षीय समारोपात भिष्माचार्य चांदणे सर यांनी समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचा ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी वक्तृत्वकला, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देऊन स्वतःला सक्षम बनवावे, असे मार्गदर्शन केले.


करमाळा तालुक्यातून हनुमंतराव अवघडे, अमोल खंडाळे, रामदास कांबळे, विकास पवार, संतोष मंडलिक, दादासाहेब पवार (ग्रामपंचायत सदस्य), शिवाजीराव जाधव (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, करमाळा तालुका), शरद पवार (तालुकाध्यक्ष, मातंग एकता आंदोलन, करमाळा तालुका), महादेवराव भिसे, ज्ञानेश्वर ढावरे, सौ. सोनाली ढावरे, प्रकाश तेलंग, शंकर पवार सर, बाबा करंडे, अभिजित मंडलिक, कपिल मंडलिक, रोहिदास आलाट, गणेश आलाट, अभिषेक मंडलिक, विश्वदत्त मंडलिक, चेतन आलाट, शुभम करंडे, संग्राम आरणे, लकी आरणे, सौ. अलका भिष्माचार्य चांदणे, निशांत भिष्माचार्य चांदणे, सौ. श्राव्यश्री निशांत चांदणे, सौ. छाया पवार तसेच सौ. कविता आरणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर पवार सर यांनी केले, तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे शिंदे सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.

सुदृढ, सुसंस्कृत व सुशिक्षित समाजाच्या निर्मितीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास करमाळा तालुक्यातील समाजबांधव, पालक, विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा