Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

*करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी* *सहा लाख तीस हजार रुपयाचे एकूण 28 मोबाईल तक्रार धारकांना शोध घेऊन केले परत*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी केली असूनसहा लाख तीस हजार रुपयाचे एकूण 28 मोबाईल तक्रार धारकांना शोध घेऊन परत केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की*करमाळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2024, 2025, 2026 मध्ये गहाळ झालेले एकूण 28 मोबाईल अंदाजे किंमत 6,30,000/- रुपये हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे व CEIR पोर्टल व्दारे मोबाईलचा शोध घेऊन तक्रारदार यांना परत करण्यात आले.*

करमाळा पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकूण 28 मोबाईल अंदाजे किंमत 6,30,000/- रु. यांचा शोध घेऊन 28 तक्रारदारास परत केले आहे.

सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे साहेब, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्हि. एस. मॅडम, करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रणजीत माने, यांचे मार्गदर्शनाखाली CEIR पोर्टल चे कामकाज पाहणारे पोकॉ/ स्वप्नील शेरखाने, पोकॉ प्रकाश जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ/ सोनवणे, यांनी केली आहे व तक्रारदार यांना विना विलंब परत केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यापुढे ज्या मोबाईल धारकाचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी आपल्या हद्दीतील पोलिस स्टेशन येथे मोबाईल चे संपूर्ण कागदपत्रासह रितसर तक्रार नोंदवावी असे आवाहन करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रणजीत माने यांनी केले आहे.


चौकट 

मोबाईल वापरधारकांना करमाळा पोलिसांनी केले आवाहन,,,,,,,,आपल्या मोबाईलमध्ये वैयक्तिक माहिती, फोटो, बँकिंग व महत्त्वाचे कागदपत्रे असतात.त्यामुळे मोबाईल वापरताना नेहमी काळजी घ्या.अनोळखी व्यक्तीला OTP, PIN, पासवर्ड किंवा UPI PIN सांगू नका.मोबाईलला Screen Lock/Password अवश्य ठेवा.अनोळखी लिंक, APK किंवा संशयास्पद ॲप डाउनलोड करू नका.बँकिंग माहिती कोणालाही फोनवरून देऊ नका.सार्वजनिक Wi-Fi वापरताना संवेदनशील व्यवहार टाळा.मोबाईल हरवल्यास तात्काळ SIM व बँकिंग सेवा सुरक्षित करा.*सावध राहा, सुरक्षित राहा—तुमचा मोबाईल आणि तुमची माहिती दोन्ही जपा!*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा