*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
वाढदिवसाचा अनोखा उपक्रम; आरुष डोलारेचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा
सांगवी मार्डी, तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पत्रकार रुपेश डोलारे यांचा मुलगा चि. आरुष डोलारे याचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा, हा संदेश देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक माने मॅडम, कोळेकर सर, चव्हाण सर, गायकवाड सर, अश्विनी डोलारे यांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
चिमुकल्या :--"आरुष डोलारे "याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक:- संपादक -हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलुज





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा