Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या नीरा नरसिंहपूरचे पोलिस ठाणे बंदच, नागरिकांची ससेहोलपट सुरूच, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून सुरू करण्याची नागरिकांची मागणी

*कार्यकारी संपादक* *एस. बी. तांबोळी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-8378081147* ----- येथील नुतन पोलिस स्टेशन डिसेंबर २०२५ मध्ये शासनाच्या राजपत्राद्वारे कागदोपत्री चालू झाल्याचे दाखवून प्रत्यक्ष तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे कारण देत बंद असून ते तातडीने चालू करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते अश्वजित सिद्धेश्वर कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते अश्वजित कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात नीरा नरसिंहपूर स्वतंत्र पोलिस स्टेशन डिसेंबर २०२५ मध्ये राज्यपालांच्या आदेशान्वये शासनाने राजपत्र प्रसिद्ध करत सुरू केले. शासनाच्या परिपत्रका नुसार पोलिसांचे मनुष्यबळ पुरवले असून सदरचे मनुष्यबळ इंदापूर पोलीस स्टेशन व बावडा पोलीस दुरक्षेत्रात वापरात आहे. परंतू पोलिस स्टेशन कागदोपत्री चालू झाल्याचे दाखवून सदरचे कामकाज काही तांत्रिक कारणांमुळे इंदापूर पोलिस स्टेशन येथून चालवले जात आहे. त्यामुळे नागरिक नरसिंहपूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेले असता तुम्ही इंदापूरला तक्रार द्या असे म्हणत धुडकावून लावले जात आहे. तसेच पोलीस स्टेशन चालू झाल्यापासून एफ आय आर दाखल झाल्या नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. इंदापूर व नीरा नरसिंहपूर पोलीस स्टेशनच्या अनागोंदी कारभाराविषयी नागरिकांमध्ये असंतोशाची भावना असून सामाजिक कार्यकर्त्यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीयांचे कुलदैवत आहे. सदर तीर्थक्षेत्रास भाविकांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे नीरा नरसिंहपूर पोलीस स्टेशन त्वरित चालू करण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून त्वरित वरिष्ठांना आदेश करावेत. अन्यथा राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयासमोर शासनाचे लक्ष वेध देण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे निवेदनात अश्वजीत कांबळे यांनी म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रती राज्यपाल देवव्रत आचार्य, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र आदींना दिलेले आहेत. चौकट - नीरा नरसिंहपूर पोलीस स्टेशन सुरू नसल्यामुळे नरसिंहपूर परिसरामध्ये म्हशी, गाई, शेळ्या, कोंबड्या, मोटार, केबल तसेच दोन चाकी व चार चाकी वाहने चोरण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. तक्रार द्यायची कुठे व कोणाला यातून मार्ग निघणार का? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. फोटो - नीरा नरसिंहपूर पोलिस स्टेशनची नुतन इमारत. ------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा