Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

ज्ञान, मानवता आणि शिक्षणाचा प्रेरणादायी संगम असलेली सुदर्शन अभ्यासिका युवापिढीस वरदान ठरेल : पोलीस निरीक्षक विलास नाळे.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी 

रविवार,६ सप्टेंबर २०२६

सहसंपादक, मो. 9922419159



ग्रामीण भागात गुणवत्ता आहे मात्र जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, निरंतर मेहनत आणि जिद्द महत्त्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्ञान, मानवता आणि शिक्षणाचा प्रेरणादायी संगम असलेली

सुदर्शन अभ्यासिका युवापिढीस वरदान ठरेल असे प्रतिपादन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी केले.


दिनांक ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन, भारताचे महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तसेच संपूर्ण मानव जातीला सेवाभाव, करुणा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या मदर तेरेसा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुदर्शन अभ्यासिका यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माय फाऊंडेशनच्या वतीने कै. सुदर्शन विंचू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या ‘सुदर्शन अभ्यासिका’चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी

 इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, श्री. वाघमारे साहेब, श्री. कोल्हे साहेब, श्री. नागमल साहेब, देसाई मॅडम, खान सर, सैय्यद  सर, गाढवे सर, सुधीर देशमाने, ॲड. धनंजय विंचू, प्रशांत विंचू यांच्यासह अनेक मान्यवर  उपस्थित होते. 

पोलीस निरीक्षक विलास नाळे पुढे म्हणाले, सध्या युवापिढीचा विविध स्पर्धा परीक्षेकडे कल आहे. एम.पी. एस.सी, यू पी एस सी, जेईई, नीट सारख्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मेहनत, सातत्य, शिस्त, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि माफक दरात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणारी ही अभ्यासिका निश्चितच अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ठरेल. या सुंदर उपक्रमातून ‘एक विद्यार्थी घडला म्हणजे एक कुटुंब घडते आणि एक पिढी घडली म्हणजे समाज घडतो’ हा विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. हा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय आहे.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोहन गुंडेकर, विपुल लोढा यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन खुशाल कोकाटे यांनी तर महेश जाधव यांनी कार्यक्रमाचे छायाचित्रण केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सुदर्शन अभ्यासिकेचे संचालक सुमित विंचू यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक व सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

चौकट : 

ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या शिक्षकांना वंदन,मानवतेची सेवा करणाऱ्या महात्म्यांना अभिवादन,आणि आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला यावेळी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्याने विद्यार्थी भारावून गेले.

सुदर्शन अभ्यासिका म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा, अभ्यासाला नवी ऊर्जा आणि भविष्यासाठी नवी आशा असल्याचे प्रतिपादन सुमित विंचू यांनी केल्यानंतर त्याचे टाळ्यांच्या गजरात उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा