*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
-----: गणरायाचे आगमन नऊ दिवसांवर आले असल्याने कुंभार वाड्यामध्ये गणेशमूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आलेले आहे. यावर्षी गणेशमूर्ती बनवण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिसवरील दरवाढीचा फटका मुर्तीकारांना बसला आहे. तरीसुद्धा ' रंगासह ' प्लास्टर ऑफ पॅरिस ' दरात वाढ झाल्याने १५ ते २० टक्क्यांनी मूर्तीचे दर वाढणार असल्याचे जालिंदर कुंभार यांनी ʼ सकाळ ' शी बोलताना सांगितले.
मागील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एका गोणीचा दर यावर्षी जवळपास दुप्पट झाला आहे. सध्याला कुंभारवाड्यात मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर मुर्त्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम चालू असल्याचे सुरज कुंभार यांनी सांगितले. गणेश मूर्ती विक्रीसाठी इंदापूर व अकलूजला मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचे अनिता कुंभार यांनी सांगितले; तर लहान मूर्तीना गणेशवाडी, गारअकोले, पिंपरी बुद्रुक, टणू, नरसिंहपूर गावातून मागणी असल्याचे अपंग मूर्तिकार सचिन कुंभार यांनी सांगितले.
परंतु यावर्षी पावसाने पाठ फिरवली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम मुर्ती विक्रीवर होेणार हे लक्षात घेवून त्या तयार करण्याचे काम सुरू असल्याचे दत्तात्रय कुंभार यांनी सांगितले. तसेच अद्यापही मोठ्या मंडळाकडून मुर्ती खरेदीसाठी विचारणा झाली नसल्याने व्यवसायावर दुष्काळाचा परीणाम जाणवण्याची शक्यता वाढली असल्याचे प्रविण कुंभार यांनी सांगितले.
चौकट : परंपरेप्रमाणे गणेश मुर्त्यां बनवण्याचे काम लाखो कारागीरांच्या हस्ते करण्यात येत असतानाही शासन या व्यवसायाकडे मदत करण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत नसल्याने व्यवसाय अडचणीत आला असल्याने शासनाने यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे दत्तात्रेय कुंभार, जालिंदर कुंभार यांनी सांगितले.
फोटो - गणेशवाडी ( ता इंदापूर ) येथील जालिंदर कुंभार याच्या घरी गणेश मुर्त्यांवर अंतीम हात फिरवताना कुटुंबिय दिसत आहेत.
.....................................................................








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा