Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

धाराशिव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा मानवी हक्क अभियान संघटनेची मागणी- अन्यथा सात दिवसानंतर लोकशाही पद्धतीने जन आंदोलन छेडण्याचा इशारा

 तुळजापूर प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

 मो9730867448




धाराशिव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क आयोगाचे, संस्थापक अध्यक्ष- अँड कर्मवीर एकनाथ आवाड, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद आवाड (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली वतीने तुळजापूर तहसीलदार कार्यालय तुळजापूर यांच्यामार्फत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांना निवेदनाद्वारे करण्यात आलेयाबाबत सविस्तर वृत्त असे की

धाराशिव जिल्हयात जुलै व ऑगस्ट 2026 मध्ये पावसाने मोठा खंड दिल्यामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका यासह खरीप पिके पावसाअभावी वाळून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर हातातोंडाशी आलेली पिके करपत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाली असून पशुधनाच्या उपासमारीची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

त्यामुळे शासनाने तातडीने पुढील बाबींची दखल घ्यावी,

तुळजापूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा.आणि सर्व नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करावेत.

शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा व पीक अनुदान द्यावे.

> तातडीची आर्थिक मदत म्हणुन शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी सरसकट ५० हजार जमा करावी. जनावरांसाठी तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा.

शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीकडे शासनाने गांभिर्याने दखल घेवुन ७ दिवसात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संविधानिक व लोकशाही पध्दतीने जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

! शेतकरी वाचला तरच शेती वाचेल!



खरेदी विक्री.संघाकडुन निवेदन देण्यात आले👆👆. उपस्थित चेअरमन सौ.अनिता श्रीकांत वाघे लिपिक श्री.दयानंद क्षीरसागर. श्रीकांत वाघे.खालिद पटेल. तानाजी खांडेकर. व परिसरातील शेतकरी.


आपले विश्वासू 

१) श्रीकांत वांगे -धाराशिव,जिल्हा उपाध्यक्ष 

२) खालील पटेल 

धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष 

३) तानाजी खांडेकर 

तुळजापूर तालुका अध्यक्ष 

४) दयानंद क्षीरसागर 

सचिव ,तुळजापूर तालुका 

इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा