श्रीपुर----- जेष्ठ पत्रकार
बी.टी. शिवशरण
मो.9579 177 671
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सचिव श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून श्रीपूर येथे क्रिडा संकुल बांधण्यासाठी पाच कोटी निधी मंजूर करण्यासाठी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असता मंत्रीमहोदय यांनी प्रधान सचिव यांना पुढील उचित कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले आहेत श्रीपूर खंडाळी रोडवर डॉ विजय डहाळे यांचे दवाखान्याचे समोर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळयाची सुमारे नव्वद एकर जमीन पडिक आहे त्यातील दहा एकर जमीन संपादित करुन क्रिडा संकुल उभे करता येते महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये सध्या विकास काम यांबरोबरच युवकांना खेळ व्यायाम योगा करण्यासाठी सध्या क्रिडा संकुल असणे गरजेचे आहे श्रीकांत शिंदे यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्रीपूरला चंद्रशेखर आगाशे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात खाजगी साखर कारखाना उभा केला त्यामुळे इथे मोठी वसाहत निर्माण झाली त्यामुळे श्रीपूर हे माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील दळणवळण असलेले केंद्र आहे शिवाय दररोज आठरा ते वीस गावं खेडी यांचा संपर्क श्रीपूरला दररोज होत असतो दि बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट ली कंपनी चे ज्ञानेश्वर आगाशे हे उत्तम क्रिकेट खेळाडू होते महाराष्ट्र रणजी मध्ये ते क्रिकेट खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविला आहे सध्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना ली श्रीपूर हा साखर कारखाना महाराष्ट्रात व सहकार क्षेत्रात आदर्श म्हणून गौरवला गेला आहे सध्या काही युवक व्यसनाधीन होऊन त्यांचे आयुष्य वेगळ्या वळणावर जाण्याची भिती आहे येणार्या नव युवक व आगामी काळात युवक व्यसनापासून अलिप्त ठेवण्यासाठी त्यांना खेळ व्यायाम योगा यांची नितांत गरज आहे हा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक सचिव श्रीकांत शिंदे यांनी श्रीपूरला क्रिडा संकुल बांधण्यासाठी क्रिडा मंत्री संजय बनसोडे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे व मुंबईत समक्ष भेटून पाठपुरावा सुरू केला आहे श्रीकांत शिंदे यांच्याशी याबाबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की श्रीपूर ही औद्योगिक वसाहत आहे आता महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये या वसाहतीचा शहर म्हणून ओळख आहे सर्व श्रीपूर मधील सामाजिक राजकीय संघटना पक्ष यांच्या नेते कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळयाची श्रीपूर खंडाळी रोडवर असलेली पडिक दहा एकर जमीन संपादित करण्यासाठी नगरपंचायतचा ठराव संमत करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत याबाबत सर्वांनी एकत्रित येऊन प्रामाणिक प्रयत्न केले तर येत्या काही महिन्यात निश्चित श्रीपूरला क्रिडा संकुल उभे राहिल या मध्ये कोणीही कसलेही पक्षीय राजकारण गटबाजी न आणता श्रीपूरला क्रिडा संकुल बांधण्यासाठी एकत्रीत येऊन पाठपुरावा करुया क्रिडा मंत्री संजय बनसोडे हे याबाबतीत त्यांची पुर्ण सहकार्याची तयारी आहे शिंदे पुढे माहिती देताना म्हणाले की मी सध्या पंढरपूर येथे स्थायिक झालो आहे पण माझा जन्म बालपण शिक्षण श्रीपूर मध्ये झाले आहे मला माझ्या मातृभुमी कर्मभूमी यांची ओढ आहे अभिमान आहे त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा नेतृत्व करायचे नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा