श्रीपुर----- जेष्ठ पत्रकार
बी.टी. शिवशरण
मो.9579 177 671
आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पुर्ण झाली आहेत पण या देशातील जातीवाद मनुवादी विचार अद्याप संपलेला नाही दररोज देशात राज्यात दलितांवर कुठं ना कुठं अन्याय अत्याचार महिलांवर लैंगिक अत्याचारांच्या घटना होतच आहेत मानसिक विकृती असलेल्या धर्म जात भाषा यामुळे दलितांना त्रास देऊन छळ केला जात आहे संविधानाने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या जातीवादी नादान हरामखोरांना वेळीच चिरडलं नाही तर त्यांची पिलावळ वाढुन दलित समाजातील वाढते हल्ले छळ जातीवाद संपणार नाही अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे कबुतरे चोरल्याचा आळ घेऊन त्या गावातील अल्पवयीन दलित मुलांना झाडाला उलटं बांधून बेदम मारहाण केली त्या गावातील जात्यांध मनुवादी किडा असणार्या गलांडे पाटील याने व त्याच्या पोरांनी त्या अल्पवयीन मुलांना जबर मारहाण करून थुंकुन ती चाटायला लावली तसेच त्यांच्या अंगावर लघुशंका केली हा प्रकार म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे दिवसाढवळ्या लोकशाही संविधान कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवून दलितांना कृर पद्धतीने वागवणयाचा हा आत्मघातकी प्रकार आहे सदर घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे पुरोगामी महाराष्ट्रात दलित महिला दलित समाजावर अन्याय अत्याचार झाल्यावर दलितांनी दलित संघटनांनीच फक्त निषेध आंदोलन मोर्चा काढायचा का इतर वेळी राजकीय सामाजिक प्रतिष्ठा सत्ता मिळवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेऊन मिरवणारे सवर्ण नेते कार्यकर्ते समाज डोळ्याला काळी पट्टी कानात खोट्या प्रतिष्ठेचे बोळे कोंबून का गप्प रहातात राजकारण समाजकारण करण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी दलितांची मते चालतात त्यांचे श्रम कष्ट मदत चालते आणि ज्यावेळी तमाम दलित समाजावर महिलांवरील अन्याय अत्याचार होतात तेव्हा हेच लबाड ढोंगी बदमाश राजकारणी व त्यांचा समाज मुग गिळून गप्प बसतो म्हणूनच आता सर्व दलित संघटना दलित समाज दलित नेते कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे येऊन एल्गार पुकारला पाहिजे जशास तसे उत्तर दिल्याशिवाय दलितांवरील हल्ले अत्याचार थांबणार नाहीत पुन्हा एकदा दलित पँथर निर्माण केली पाहिजे दिसेल जिथं अन्याय तिथं पेटुन उठु आम्ही न्यायासाठी संरक्षणासाठी रस्त्यावर येऊ आम्ही या विचाराने दलित तरुणांत प्रेरणा उमेद ऊर्जा बळ देण्यासाठी संघटित होऊन दलित पँथर पुन्हा गावोगावी शहरात राज्यात काढण्याची गरज आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा