Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

वडिलांना कोर्टातून जामीन होऊ देत नाही या कारणास्तव एकास जबर मारहाण --फिर्यादी हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभागात उपचारा साठी दाखल


 

टाइम्स 45 न्युज मराठी

                  माझे वडिलांना कोर्टातून जामीन मिळू देत नाही लय मस्ती करतोय, कोर्टात जातोय, म्हणून गणेश सदाशिव भोसले वय 40 वर्षे रा. रत्नपुरी 18 संग्रामनगर- यास जबर मारहाण केल्याने त्याला संग्रामनगर येथील अश्विनी रुग्णालयात अति दक्षता विभागात दाखल केले आहे या याबाबत फिर्यादी गणेश भोसले यांनी आठ आरोपी व दोन अनोळखी इसमा विरुध्द अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद केल्याने गुन्हा दाखल झाला असुन या पैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी फिर्यादी गणेश सदाशिव भोसले वय 40 वर्ष धंदा शेती राहणार रत्नपुरी नंबर 18 संग्रामनगर ता. माळशिरस जि. सोलापूर हे कोर्टाचे काम संपवून दुपारी अकलूज येथे त्यांच्या घरी आले त्यानंतर रात्री 8/30 वाजता चे सुमारास ते जेवण करून पान खाण्यासाठी अशोक चौक येथे आले व पान खाऊन ते घरी जात असताना ते रत्नपुरी 8 संग्राम नगर ओलांडून रात्री साडेनऊ वाजता चे सुमारास जात असताना पाठीमागून एक मोटर सायकलवर तीन इसम आले व त्यांनी फिर्यादी ला थांबविले त्यावेळी रस्त्यावरील लाईटचे व मोटरसायकलचे लाईटचे उजेडात पाहिले असता त्यांचे पैकी 1) रोहित राजू भोसले असल्याचे फिर्यादी यांनी पाहिले व इतर दोन अनोळखी होते त्यांचे हातात लोखंडी कोयते होते त्यापैकी रोहित भोसले यांनी फिर्यादीस तू नाना असबे खून केस मध्ये लय मस्ती करतोय जातोय माझे वडिलांना जामीन होऊ देत नाही तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून त्या तिघांनी त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोकीत ,दोन्ही हातावर तोंडावर डाव्या पायावर ,सपास वार करून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केले आहे म्हणून यातील आरोपी1) प्रवीण उर्फ पंपू भोसले 2) अतुल उर्फ पिंटू मोहिते 3) साजिद इब्राहिम सय्यद 4) आदित्य मोहिते , 5)नितीन एकतपुरे 6)अतुल उर्फ भैय्या इंगळे 7)नागेश उर्फ गोपी इंगळे रोहित राजू भोसले सर्व राहणार अकलूज तालुका माळशिरस आणि अनोळखी दोन्ही इसम यांना मारण्याचे सुपारी दिली होती म्हणून वरील आरोपीवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 610/ 2023 ,भारतीय दंड विधान कलम 307 ,120 ब ,341 ,34 प्रमाणे 25 ऑगस्ट 2023 रोजी 6/ 49 वा. गुन्हा दाखल झाला आहे याबाबत दाखल अमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी तर तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा