मायभूमी माझी आहे खान रत्नांची
परकीयांनी लुटली हि लंका सोन्याची
तरी कास ना सोडली आम्ही प्रयत्नांची
जनु गळाभेट घडवली पृथ्वी अन चंद्राची
दिवस गर्वाचा सोनेरी उगवला
एक नवा इतिहास रचला
तिरंगा चंद्रावर डोलाने फडकला
जगी गौरवानवीत भारत झाला
जगी या वाढली देशाची शान
गर्वाने फुगली छाती उंचावली मान
शास्त्रज्ञांचे सफल झाले अभियान
भारतीय टीमने दिले जगाला ज्ञान
चंद्रावरुनी तिरंगा पाहे हसुनी स्वदेशाकडे
यशस्वी उड्डाणं हे लक्ष जगाचे भारताकडे
सनई चौघडे वाजती चोहीकडे
लक्ष जगाचे आता विक्रमकडे
विजय भारताचा रचला इतिहास जगाचा
कळले जगास आता नाही आकार गोल चंद्राचा
इतिहास नवा रचला पराक्रम हा भारताचा
अभिमान आम्हास या शास्त्रज्ञांचा
अभिमान आम्हास या शास्त्रज्ञांचा .
🇮🇳 *जय हिंद* 🇮🇳
*कवियात्री*
*नुरजहाँ फकृद्दीन शेख*
*गणेशगाव*
ता.माळशिरसजि.सोलापूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा