विशेष प्रतिनिधी---कासिम मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
सदाशिवराव माने विद्यालय माणकी ता . माळशिरस या विद्यालयात दि.१६/९/२०२३ रोजी विजय विष्णुपंत आढाव व . ज्योती विजय आढाव यांच्या वसुमती फाऊंडेशन पुणे यांच्या तर्फे माणकी गावचे सुपुत्र व विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री . प्रविण रामदास रणनवरे यांच्या प्रयत्नातून शाळेतील गरजू व दुर्गम भागातून येणाऱ्या मुलींना १५ सायकलींचे वाटप करण्यात आले . याप्रसंगी प्रविण रणनवरे यांचे वडील . रामदास रणनवरे शिवामृत दुधउत्पादक संघ विझोरीचे संचालक प्रशाला समिती सदस्य .संग्रामसिंह रणनवरे स्थानिक प्रशाला समिती सभापती . रामदास निंबाळकर विकास सोसायटी सदस्य राजेंद्र निंबाळकर माजी ग्रामपंचायत सदस्य .राजेंद्र शिंदे तसेच .बापूराव रणनवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .बी. ए .पवार सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन .एच.एस. पवार सर यांनी केले .विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रशाला समिती सभापती श्री . रामदास निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा