Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

मकाई साखर कारखान्यावर जप्ती घाला साखर आयुक्त यांचे जिल्हाधिकारी मार्फत करमाळा तहसीलदारांना आदेश


 

संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                            शेतकऱ्यांची ऊस गाळपासाठी आलेली बिले अदा करा या मागणीसाठी जनशक्ती संघटनेने 5 सप्टेंबर रोजी साखर संकुल येथे धरणे आंदोलन केले होते. यानंतर साखर आयुक्त, चेअरमन व कार्यकारी संचालक तसेच शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये १३ सप्टेंबर पर्यंत आंदोलनात आलेल्या शेतकऱ्यांची 50% बिल अदा करण्याची हमी मकाई व कमलाई या दोन कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व चेअरमन यांनी घेतली. मात्र दिलेल्या शब्द व तारीख उलटून गेल्यानंतरही बिले न दिल्याने जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी आज पुन्हा एकदा साखर संकुलात धाव घेऊन या संदर्भात जाब विचारला.


 यावेळी साखर आयुक्तांनी लागलीच जिल्हाधिकाऱ्यांना मकाई सहकारी साखर कारखान्यावर तहसीलदारामार्फत जप्ती करण्याचे भ्रमणध्वनी द्वारे आदेश दिल्याचे अतुल खूपसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.




 पुढे बोलताना ते म्हणाले की, मकाई सहकारी साखर कारखाना व कमलाई सहकारी साखर कारखाना यांना मोठ्या विश्वासाने शेतकऱ्यांनी ऊस घातले आहे. मात्र शेतकऱ्यांची देणे देताना चेअरमन व कार्यकारी संचालक जाणीवपूर्वक हात आखडता घेतात. वेळोवेळी शेतकऱ्यांनी बिले मागून ही संचालकांनी हात वर केल्याने सर्व शेतकरी जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून साखर संकुलात गेले आणि साखर आयुक्तांना धारेवर धरले. यावेळी झालेल्या बैठकीत 7 दिवसात शेतकऱ्यांची 50 टक्के बिले अदा करण्याची ग्वाही दिली. मात्र आज सात दिवस उलटून गेल्यानंतरही कारखानदारांकडून कोणतीच हालचाल नसल्याने जनशक्ती संघटनेने पुन्हा एकदा साखर संकुलात धाव घेऊन साखर आयुक्तांची भेट घेतली. यावेळी साखर आयुक्तांनी जप्तीचे आदेश दिल्याचे खूपसे पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा