अकलूज येथे मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साह साजरा
अकलूज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो-9890 095 283
मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापन दिन अकलूज येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने शेंडगे होते तर विचारपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील ,प्रांताधिकारी नामदेव टिळेकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील, गटविकास अधिकारी विनायक गुळवे,तालुका कृषी अधिकारी पूनम चव्हाण,अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे,नायब तहसीलदार अमोल कदम,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निनाद पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या अक्काताई माने,मनोरमा लावंड,संभाजी ब्रिगेडचे दिगंबर मिसाळ यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रारंभी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे म्हणाले की,मराठा सेवा संघ हा बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारा असून सर्वांचा विकास हाच मराठा सेवा संघाचे धोरण आहे.माळशिरस तालुक्यात सन १९९७ साली मराठा सेवा संघाची स्थापना झाली तेंव्हापासून तालुक्यात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली यावेळी उत्तमराव माने,श्रीमती साळुंखे,हंसाजीराव माने-देशमुख,व्यवहारे,अशोकराव रणनवरे,कार्याध्यक्ष डॉ.अमोल माने शेंडगे,बबनराव शेंडगे,हेमा मुळीक,शारदा चव्हाण,पूजा मोरे, वनिता कोरटकर,उपाध्यक्ष विनोद बाबर,उदय कदम,जयकुमार केचे पाटील,अशोक पवार, अण्णासाहेब मगर,बाळासाहेब पवार ,शिवाजीराव लोंढे,सचिन पराडे,विजय भोसले आदी मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निनाद पाटील तर सूत्रसंचालन व आभार डॉ.अमोल माने शेंडगे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा