रामदासजी आठवले भाजपा बरोबर युतीतून जागा वाटपात फसवणूक होणार नाही याची
श्रीपूर----- जेष्ठ पत्रकार
बी.टी. शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9579 177 671
आरपीआयचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी येत्या सर्व निवडणुका भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना युती सोबत लढण्याचे जाहीर केले आहे महाराष्ट्रात आरपीआय आठवले गट सक्षम व प्रबळ आहे ते ज्यांचे बरोबर निवडणुकीत असतात त्यांची सत्ता येते हा आजपर्यंत चा राजकीय सामाजिक इतिहास आहे आठवले यांच्या पक्षांमुळे राजकीय सत्ता मिळवलेले कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व गत लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप बरोबर आरपीआय आठवले गटाची युती होती त्यांना सत्ता मिळाली म्हणजेच एकंदरीत आरपीआयला बरोबर घेतल्या शिवाय सत्तेचा सोपान चढता येत नाही ही झाली राजकीय सामाजिक वाटचाल पण रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला दरवेळी विधानसभा असेल लोकसभा असेल जागा वाटपात सन्मानजनक जागा प्रतिनिधित्व दिले जात नाही त्यामुळे रिपब्लिकन पक्षांवर सातत्याने अन्याय व दुजाभाव केला जातो आता पर्यंत रामदास आठवले यांच्या सुचनेमुळे किंवा आदेशानुसार राज्यातील आरपीआय कार्यकर्ते नेते शांत राहिले मात्र यावेळी आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात जर भाजपने पहिले पाढे पंचावन्न अशी भूमिका घेतली तर मात्र आरपीआय कार्यकर्त्यांचा संयमाचा बांध फुटला तर आवरणे कठीण होईल रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत दोन जागा व विधानसभा निवडणुकीत बारा जागा सोडण्याची भाजप नेतृत्वाकडे वारंवार मागणी केली आहे सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे पक्ष व्यापक झाला आहे पक्षाचे ध्येय धोरण भुमिका ठाम आहे भाजपच्या संधीसाधू व मतलबी धोरणावर आता विश्वास कितपत ठेवायचा अशी शंका कार्यकर्ते उपस्थित करत आहेत कारण एका जागा लोकसभेला व विधानसभेच्या सोडलेल्या त्या जागेवर भाजपचे उमेदवार उभे केले ही कुटनिती आता सर्वांच्या लक्षात आली आहे रामदास आठवले यांनी भाजप बरोबर युतीतून आरपीआयला मागणी केल्यानुसार सन्मानजनक जागा पदरात पाडून घेऊन आरपीआय कार्यकर्त्यांचा स्वाभिमान अस्मिता जागृत ठेवावी या अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत
Fastag साठी संपर्क साधा 8408817333
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा