Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

सहकार महर्षी साखर कारखान्याचा व डिस्टिलरीचा विस्तार करणार ----जयसिंह मोहिते पाटील

 


अकलुज ---प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

                            

                     साखर उद्योगामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत.त्याचबरोबर सरकारचे धोरणही बदलत आहेत.साखर निर्मितीबरोबर सरकार इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देत आहे.जे साखर कारखाने येथून पुढे अल्कोहोल निर्मिती करतील तेच फायद्यात राहतील.त्यासाठी आपल्या साखर कारखान्याचा विस्तार करणे गरजेचे असल्याचे मत सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.

           सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मोहिते-पाटील बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील,ॲड.प्रकाश पाटील,मिलींद कुलकर्णी,दत्तात्रय भिलारे,कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले,सचिव अभयसिंह माने देशमुख सर्व विद्यमान व माजी संचालक,सभासद शेतकरी,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             पुढे मोहिते-पाटील म्हणाले की,साखर व उपपदार्थ निर्मितीबरोबरच सहकार महर्षि कारखाना सामाजिक कार्यामध्ये सातत्याने अग्रेसर आहे.पाणी टंचाईच्या काळात कारखान्याने सुमारे सव्वादोन कोटी लिटर आर ओ फिल्टर पाण्याचा मोफत पुरवठा केला होता.त्याचबरोबर कोरानाच्या काळात सुमारे १२ हजार कुटूंबांना कारखान्याने सहाय्यता पुरवली होती.सध्या कारखान्याची गाळप क्षमता ८ लाख मे.टन एवढी आहे.ही क्षमता अपुरी पडत आहे.त्यासाठी कारखान्याचा सुमारे १० लाख ५० हजार मे.टन एवढा विस्तार करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर सध्या डिस्टीलरीमधून सुमारे ९० हजार लिटर अल्कोहोलची निर्मिती होते.त्याचाही विस्तार करणे गरजेचे आहे.शासनाने २० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी करून बी हेवी रसापासून इथेनॉल उत्पादनावर भर देण्याचे धोरण संचालक मंडळाने ठरवले आहे.यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व १४ विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी देवून आपला संस्थेच्या कामकाजावर पुर्ण विश्वास असल्याचे दाखवून दिले. ज्या ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी उल्लेखनीय ऊस उत्पादन केले त्यांचा सन्मान करण्यात आला


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा