ज्येष्ठ -पञकार,बी.टी.शिवशरण.
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9527 456 958
माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्याचे गाळप हंगाम येत्या महिन्याभरात सुरू होऊ शकतात मात्र श्रीपूर ते अकरा सेक्शन अकरा सेक्शन ते चौदा सेक्शन महाळुंग मायनर ते स्टोअर पर्यंत तसेच तोंडले ते माळखांबी व बोरगाव ते आंबेडकर चौक या भागातील रस्ता पुर्ण खराब आहे अशा खराब रस्त्यांनी तालुक्यातील चार व माढा तालुक्यातील दोन व माण तालुक्यातील एक साखर कारखान्यांची ऊस वहातुक होतं आहे अशा खराब रस्त्यांनी ऊसाची वहातुक करणारी वहाने दिवसरात्र चालू असतात या खराब रस्त्यांची कोणीच दखल घेत नसल्याने या भागात नेहमी अपघात होत आहेत दर वर्षी निष्पाप लोक अपघातात आपल्या प्राणास मुकतात अकरा सेक्शन ते चौदा सेक्शन अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे तसेच या रस्त्यावर दहा किमी परिसरात टपरीधारक व्यापारी यांनी रस्त्यावर आपल्या व्यवसाया साठी अतिक्रमण करुन रस्ते अरुंद करून वहातुकीला अडथळे निर्माण केले आहेत त्यामुळे सर्वच रस्त्यांवर वहातुकीची कोंडी होऊन रहदारी ठप्प होण्याच्या घटना सातत्याने होतात याकडे ना तालुक्यातील कारखानदार लक्ष देतात ना नगरपंचायत नगरपरिषद प्रशासन नागरिकांना मात्र आपला जीव धोक्यात घालून जगावे लागते खराब रस्त्यांमुळे नेहमी ऊसाच्या ट्रेलर पलटी होऊन नेहमी अडथळे निर्माण होतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा