Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन व रक्षाबंधन उत्साह साजरा

 सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन व रक्षाबंधन उत्साह साजरा


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                  अकलूज, ता.५: येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. ०५/०९/२०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता शिक्षक दिन व रक्षाबंधन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . सदर कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरच्या संचालिका शिवरात्री बहनजी उपस्थित होत्या. शिक्षक दिन व रक्षाबंधन या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.


कार्यक्रमावेळी शिवरात्री बहनजी यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकाचे महत्व व ध्यान, अध्यात्म किती महत्त्वाचे असते हे पटवून दिले. शिक्षक हा पिढी घडवत असतो. त्यांचा आदर राखला पाहिजे असे सांगितले. त्यानंतर सर्व उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. 


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात ब्रह्माकुमारी सेंटरचे उल्लेखनीय कार्य असल्याने आदर व्यक्त केला. तसेच सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. .शिवतेज माने- देशमुख, .शिवतेज बागल, आदित्य बचुटे या विध्यार्थ्यानी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. 



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. किशोर भिताडे यांनी तर आभार प्रदर्शन वैभवी गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून . नागेश फिरमे यांनी काम पाहिले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा