आसाम मधील "बोका चाऊल" हा तांदूळ न शिजवता खाता येतो
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
आशियाई देशांमधील लोकांच्या आहारात भात महत्त्वाचा घटक आहे. भारतातही जेवणात भाताचे स्थान नेहमीच अबाधित राहिलेले आहे. प. बंगाल, कोकण यासारख्या काही भागात तर ते अधिकच महत्त्वाचे आहे. भात करायचा म्हटलं की तांदूळ चांगले पंधरा ते वीस मिनिटे शिजवत ठेवावे लागतात. मात्र, आपल्याच देशात एक अशा प्रकारचा तांदूळ देखील पिकतो जो न शिजवताही खाता येतो.
आपल्याकडील भात करायचा म्हटलं की तांदूळ चांगले पंधरा ते वीस मिनिटे शिजवत ठेवावे लागतात.
_मात्र, आपल्याच देशात एक अशा प्रकारचा तांदूळ देखील पिकतो जो न शिजवताही खाता येतो. आसाममध्ये हा तांदूळ पिकत असून बोका चाऊल असे या तांदळाचे नाव आहे. हा तांदूळ फक्त पाण्यात भिजवला तरी खाण्याजोगा बनतो. या तांदळाला आता जीआय (जिऑग्रॉफिकल इंडिकेशन) चा टॅग मिळाला आहे. त्यामुळे आता या तांदळावर आसामचा कायदेशीर अधिकार असणार आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, ‘बोका चाऊल’ हा तांदूळ आसाममधील नलबारी, बारपेटा, गोलपाडा, बक्सा, कामरूप, धुबरी, कोकराझर, दररंग या जिल्ह्यात पिकवला जातो. आसामी भाषेत त्याला ओरिजा सातिवा असे म्हटले जाते. या प्रकारच्या तांदळाचा शोध सतराव्या शतकात लागला होता, असे बोलले जाते._
_17 व्या शतकात मुघलांसोबत लढताना आसाममधील सैनिक याच तांदळाचा भात तयार करायचे. पोहे जसे पाण्यात भिजवून लगेच खाता येऊ शकतात तसाच हा तांदूळ आहे आसाममध्ये बोका चाऊल तांदळापासून तयार केलेला भात हा दही, दूध, ताक, साखर, गूळ अशा पदार्थांसोबत खाल्ला जातो._
बोका चाऊल हा तांदूळ आसाममधील नलबारी, बारपेटा, गोलपाडा, बक्सा, कामरुप, धुबरी, कोकराझर, दररंग या जिल्ह्यात पिकवला जातो. आसामी भाषेत त्याला ओरिजा सातिव असे म्हटले जाते. या प्रकारच्या तांदळाचा शोध सतराव्या शतकात लागला होता असे बोलले जाते।
सौजन्य ;-
माहिती सेवा ग्रुप--पेठ वडगाव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा