संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
अकलूज येथील मुस्लिम दफनभूमीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून" लाव लिजावा- टिमकी बजाव" असा प्रकार होत असून याबाबत अकलूज नगर परिषदेचे प्रशासन यांच्यावर काय कारवाई करणार असे बोलले जात आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की आघाडी सरकारच्या काळात राज्याचे माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या निधीतून अकलूज येथील दफनभूमीस 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते ते त्या निधीतून कामास प्रारंभ झाला प्रारंभी दफन भूमीच्या दक्षिणेकडील भिंतीचे काम पूर्ण झाले असून त्या भिंतीस अंदाजे 15 लाख रुपये खर्च झाल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात येते अद्याप याचा हिशोब झाला नाही तसेच उर्वरित दहा लाखात पश्चिमेकडील भिंती चे कंपाऊंड काम चालू असून ठेकेदाराकडून नित्कृष्ट दर्जाचे काम होत आहे या बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य कमी दर्जाचे वापरले जात असून बांधकामासाठी लागणारा" डस्ट" हा माती मिश्रित वापरला जात असून या कंपाउंडच्या भिंतीमध्ये उभे कॉलम मध्ये पूर्णपणे रिंगा चा वापर न करता अर्ध्या कॉलमपर्यंत रिंग वापरले जात आहेत त्यामुळे कॉलम निकृष्ट दर्जाचे होत आहे संबंधित ठेकेदारास वारंवार विनंती करून सुध्दा नगर परिषदेच्या आदेशाला धुडकावून मनमानीपणे निकृष्ट दर्जाचे काम होत आसल्याचे निदर्शनास येत आहे तरी अकलूज नगर परिषद प्रशासन यांनी याकडे जातीने लक्ष देऊन उत्कृष्ट दर्जाचे काम कसे होईल याची खबरदारी घ्यावी - अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे सचिव-- जावेदभाई बागवान यांनी केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा