Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

काहीतरी घडणार आहे नक्की! शिंदे फडणवीस दिल्लीला रवाना-- अजित पवार-- गटाचे नेते देवगिरीवर जमू लागले,

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                        राज्यात आजच्या दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. कोरोना काळातही कधी बैठकांना दांडी न मारणारे अजित पवार यांनी आज चक्क कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी लावली. ते आले नाहीत म्हणून विचारल्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले आणि नंतर थोड्याच वेळात शिंदे-फडणवीस दिल्लीला रवाना झाले. यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 


राज्यात पडद्यामागे मोठ्या घडामोडी शिंदे-फडणवीसांचे विमान दिल्लीला उडाले तेव्हा सुरु झाल्या आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांनी देवगिरीकडे कूच करण्यास सुरुवात केली होती. आता तिथे जोरदार खलबते सुरु झाली आहेत. अजित पवार यांच्या निवासस्थानी पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक सुरु झाली आहे. अजित पवारांना जर बरेच नाहीय तर मग हे नेते तिथे का जमले आहेत, असा सवाल आता जनतेला पडू लागला आहे. 


भुजबळ यांना देवगिरीवर पत्रकारांनी घेरताच त्यांनी ही बैठक आधीच ठरलेली होती असे सांगितले. तसेच अजित पवारांच्या घशाला संक्रमण झाल्याचेही सांगितले. कॅबिनेट बैठकीला अजित पवार आले नाहीत तरी आमची बैठक देवगिरीवर होणार आहे. प्रफुल्ल पटेल या बैठकीत असणार आहेत. अजित पवारांना राजकीय आजारपण नाहीय, असे भुजबळ म्हणाले. 

अजित पवार दिल्लीत होणाऱ्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीला जाणार होते. ही बैठक ७ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, त्या बैठकीला देखील ते दिल्लीला जाणार नसल्याचे समजते आहे. यामुळे नक्कीच काहीतरी बिनसल्याचा अंदाज कार्यकर्ते लावू लागले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा