अकलुज ---प्रतिनिधी
शकुर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी
ईश्वराचा विशेष आशिर्वाद लाभलेले जगामध्ये असे कित्येक कलाकार आहेत जे कधी प्रसिद्धच झालेले नाहीत पण त्यांची कला मात्र असामान्य असते, हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील सडवे ह्या छोट्याखानी गावात राहणारा मंथन... इयत्ता पाचवी मध्ये शिकतो, त्याची चित्र पाहून मी भारावून गेलो. अगदी सहजगतेने, कोणतेही ब्रँडेड कलर न वापरता त्याने रेखाटलेली चित्र खरंच असामान्य आहेत. मंथनसारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कलाकारांच्या कलेला चालना मिळाली, मदत मिळाली तर खरंच त्यांच्या कलेला आणि त्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल.असा आशावाद मंथनचे भाऊजी मनिष जागडे यांनी दोनच दिवसापूर्वी त्याचा व्हिडिओ शेअर करत केला होता.तो व्हिडीओ शाळेतील मुख्याध्यापक शामराव वरेकर,नेहा उकसकर,प्रभाकर जगताप तसेच निकिता मेंगे या गुरुजनांनी पाहून त्याला जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे व्यासपीठ मिळवून दिले,आज दापोली येथे संतोषभाई मेहता शिक्षण संस्था दापोली मार्फत आयोजीत स्पर्धेत मंथनने आपली चुनूक दाखवत,जिल्ह्यात पाचवी ते सातवी गटात तिसरा क्रमांक प्राप्त केला,यावेळी आयोजक शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे यांनी त्याचे तोंडभरुन कौतुक केले.
संस्थेचे पदाधिकारी सरोज मेहता,सुजय मेहता,आदि.मान्यवरांचे हस्ते मंथनचा प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह देऊन गौरव करणेत आला.या यशाबद्दल
मंथनचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा