प्रतिनिधी-मोहम्मद कैफ ,तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी
फिर्यादी सुनील अर्जुन खेडेकर, सहाय्यक . पोलीस निरिक्षक नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी आरोपी नामे १) लखन शामराव काळे, २) किसन शामराव काळे दोघे राहणार चिंचोली काटी ता. मोहोळ जि. सोलापूर यांचेविरुद्ध दिलेले फिर्यादीवरुन अकलुज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ०२/२०१५ भा.द.वि.सं.क. ३०७, ३५३, १४३, १४७, १४८, १४९ व सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे, अकलुज पोलीस ठाणे यांनी करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यात आले होते.
सदर केस मध्ये सदर दोन्ही आरोपीस भा.द.वि.सं. कलम ३०७ व ३५३ अन्वये दोषी धरून ३०७ मध्ये नऊ (९) वर्षे सक्त मजुरी व ३५३ मध्ये दोन वर्षे सक्त मजुरी (दोन्ही एकत्र ) प्रत्येकी ५००/- रु. दंड, आरोपींनी दंड न भरल्यास दहा दिवस साधी कैद अशी शिक्षा मा. एम. एन. पाटील साहेब, अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, सेशन कोर्ट माळशिरस यांनी दिनांक ०३/१०/२०२३ रोजी सुनावली आहे.
सदर केसमध्ये सरकारी वकिल, . संग्राम पाटील यांनी पाहिले तसेच कोर्ट पैरवी ऑर्डली म्हणून पो.हे.कॉ./१४३० आर. एम. तांबोळी, पो.हे.कॉ./ १७६४ एम.पी.तांबोळी ने. अकलूज पोलीस ठाणे यांनी काम पाहिले.
"सदर केसमध्ये शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, डॉ. सई भोरे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, दिपरतन गायकवाड, प्रभारी अधिकारी, अकलूज पोलीस स्टेशन यांनी मार्गदर्शन केले तसेच अभियोग पर्यवेक्षण अधिकारी म्हणून स. पो. नि. गणेश चौधरी, अकलूज पोलीस ठाणे यांनी काम पाहीले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा