विशेष---- प्रतिनिधी
कासिम (राजु)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.84088 17333
ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक असून अशा परिस्थितीत बाविस्टीन ची प्रक्रिया केल्यास रासायनिक खताची बचत केली जाते. तसेच उसामध्ये शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये 10 ते 15 टक्के वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे असे मत कृषीदुत शेखर पठाडे, अनुप परदेशी, अनिकेत सरवदे, रोहन पाटील, ओंकार पाटेकर, प्रशिक नगराळे, विशाल पराडे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत धर्मपुरी ता.माळशिरस जि. सोलापूर येथे व्यक्त केले.
पुढे बोलताना या कृषी दुतांनी सांगितले की, ऊस उत्पादनामध्ये घट येण्याची जी प्रमुख कारणे आहेत त्यामध्ये शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा अभाव हे प्रमुख कारण असून बहुतेक शेतकरी वर्षानुवर्षे जुने, निस्तेज झालेले, अशुद्ध रोगट, किडके, खोडवा पिकातील ऊस बेणे वापरतात. यामुळे उगवण कमी होते, पीक जोमदार नसते आणि असा उस हा रोग-किडींना लवकर बळी पडतो.
त्यासाठी बाविस्टीन हे बुरशीनाशक वापरल्याने ऊसावर पडणारे रोग कमी होतात. या कृषीदुतांनी प्रात्यक्षिकाद्वारे उसाच्या बेण्यावर बाविस्टीन या बुरशीनाशकाचा प्रक्रिया करून दाखवली.
या उपक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी. नलवडे, समन्वयक प्रा. एस.एम. एकतपुरे, प्रा. एम.एम. चंदनकर आणि प्रा. एच.व्ही. कल्याणी आणि प्राध्यापक डॉ. डी.एस. ठावरे (प्लांट पॅथॉलॉजी विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा