Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

नांदेड मधील मृतांचा आकडा ८५ वर-- रुग्ण मृत्यूचे सत्र सुरूच-- आणखी १५ रुग्णांचा बळी.

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                        नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचे सत्र काही केल्या थांबेनासे झाले आहे. रुग्णांच्या मृत्यूबाबत हायकोर्टासह मानवी हक्क आयोग, बाल हक्क आयोगाने गंभीर दखल घेऊन आरोग्य प्रशासन, राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, रुग्ण मृत्यूचा मोठा आकडा समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. परंतु उपाययोजना करूनही येथील रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. मागील २४ तासांत येथील रुग्णालयात १५ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्ण मृत्यूचा आकडा ८५ वर गेला आहे.



नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पहिल्याच दिवशी २४ तासांत तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना औषधाचा कमी पुरवठा आणि मनुष्यबळाची कमतरता या मुद्यावरून राज्य सरकारला घेरले होते. मात्र, राज्य शासनाने ही कारणे चुकीची असल्याचे सांगत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, या घटनेने नांदेडसह राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यातच छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टरांचे एक पथक नांदेड येथे दाखल झाले. अतिगंभीर रुग्णांवर अधिक काळजीपूर्वक उपचार करण्यात आले. डॉक्टरही जातीने लक्ष देऊन आहेत. मात्र, रोज रुग्णांच्या मृत्यूमध्ये मोठ्या संख्येने भर पडत आहे. काल रुग्णांचा आकडा ७० वर असताना मागच्या २४ तासांत आणखी १५ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मृतांचा आकडा ८५ वर गेला आहे. त्यामुळे आरोग्य खात्यातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.


येथील रुग्णालयात मागील २४ तासांत एकूण ६२२ रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत ७३२ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. मागील २४ तासात म्हणजेच दि. ७ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकूण १५४ नवीन रुग्णांची भरती झाली. या २४ तासांत ९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. याचबरोबर या २४ तासांत १५ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. यात ६ नवजात बालक (पुरुष जातीचे ५, स्त्री जातीचे १ ) व बालक २ (स्त्री जातीचे) व प्रौढ ८ (पुरुष जातीचे ५, स्त्री जातीचे २) यांचा समावेश आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश मनूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.


सौजन्य ;--


आवाजा महाराष्ट्राचा.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा