गणेशगांव (नूरजहाँ शेख)
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत देशाचा शिरपेचात मानाचा तुरा लावणारी सुवर्णकन्या टेनिसपटू ऋतुजा संपतराव भोसले हिचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फटाक्याच्या अतषबाजीत, जेसीबीने फुलांची उधळण करीत , ढोल हलगी ताशांच्या गजरात शेकडो मोटार सायकलची रॅली,ओपन जिप्सी कारला लावलेला भारताचा तिरंगा ध्वज त्या कारमध्ये ऋतुजा भोसले, वडील संपतराव भोसले,आई निता भोसले यांची दुपारी ३:३० वाजल्यापासून सराटी येथून निघालेली मिरवणूक सर्वांची लक्ष वेधून घेत होती.हि मिरवणूक पहाण्यासाठी माळशिरस तालुक्यातील लोकांनी गर्दी केली होती.
नेत्रदीपक सन्मान सोहळा श्री हनुमान विद्यालय २५/४ लवंग येथे झाला ग्रामस्थांच्या वतीने चांदीची गदा देऊन तिला सन्मानीत करण्यात आले . सुवर्णकण्येचे वडील डीवायएसपी संप्तराव भोसले आई निता भोसले यांचे स्वागत हार,फेटा,शाल, पुष्पगुच्छ देऊन अतिशय उत्साहाने जागो जागी झाले.जिप्सी गाडीतून ऋतुजाची मिरवणूक निघाली तेव्हा प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून येत होता गाडी समोर तिरंगा ध्वज अभिमानाने डौलाने फडकताना पाहून प्रत्येकाच्या तोंडातून नकळत शाब्बास ......ऋतुजा.... हे शब्द पडत होते.देशासाठी ती मानाचा तुरा ठरली आहे परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणेचा स्रोत बनली आहे ग्रामीण भागातील जे उत्तम खेळाडू आहेत त्यांनी या सुवर्णकन्येचा आदर्श घ्यावा .
*खेळाडूंनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कठोर परिश्रम घ्यावे आणी एका पाठोपाठ एक पदके मिळवून जगात देशाचे नाव गाजवावे.असे लवंग (२५/४) लवंग येथे आपले मनोगत व्यक्त करताना ऋतुजा म्हणाली.*
*पुन्हा ऑलम्पिकमधून सुवर्ण पदक घेऊनच येईन माझ्या ग्रामस्थांनचे प्रेम हे माझ्यासाठी प्रेरणा आहे.माझ्या आई वडिलनी मला खेळामध्ये प्रोत्साहन दिले.त्यामुळे मी सुवर्ण पदक मिळविण्यात यशस्वी झाले.गावाकऱ्यांनी केलेले माझे स्वागत पाहून मला आता वाटत आहे की मी पुन्हा ऑलम्पिकमधून मेडल घेऊनच इथे येईन.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा