उपसंपादक ;नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
*यशवंतनगर*: येथे झालेल्या माळशिरस तालुकास्तरीय लंगडी क्रीडा स्पर्धेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग शाळेतील एकूण तीन संघ पात्र ठरले. त्यापैकी लहान गट लंगडी मुले हा संघ शिंगोर्णी या संघास हरवून तालुकास्तरीय स्पर्धेत विजेता ठरला.2008-09पासून तालुका स्पर्धेत विजयी परंपरा याही वर्षी कायम राखत लवंग शाळा जिल्हा स्पर्धेसाठी सोलापूर येथे खेळण्यास पात्र ठरला. मुख्याध्यापक लोखंडे सर, लालासाहेब गायकवाड सर,बशीर मुलाणी सर,दिलीप मुळे सर,शितल वाघ मॅडम, जावीद मुलाणी सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडू व शिक्षकांचे विस्तार अधिकारी करडे साहेब व गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब, सरपंच प्रशांत पाटील यांनी अभिनंदन केले व जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा