Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दूध संघावर गुन्हे दाखल करा.- अजित बोरकर

 


अकलूज (प्रतिनिधी) लक्ष्मीकांत कुरुडकर.

                  दुधाला 34 रुपये दर निश्चित करा तसे न केल्यास जे दूध संघ शासकीय जीआर चे उल्लंघन करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ना ईलाजाने रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


महाराष्ट्र शासनाने दुधाच्या संदर्भामध्ये 14 जुलै 2023 रोजी एक शासनाने जीआर काढलेला होता. त्यामध्ये जी दूध नियंत्रण समिती होती त्यांनी दुधाला 34 रुपये दर निश्चित केलेला होता. या समितीमध्ये असे ठरलेले होते की पुन्हा तीन महिन्यांनी समितीची बैठक होईल त्यावेळेस पुढील दुधाचे दर निश्चित केले जातील आतापर्यंत दूध दर नियंत्रण समितीची कोणतीही बैठक झालेली नसताना खाजगी व सहकारी संस्थांनी दुधाचे दर हे प्रति लिटर 27 ते 25 रुपये इतके केलेले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकोटीस आलेला आहे. पशुखाद्याचे व जनावरांच्या चाऱ्याचे वाढलेले दर पाहता हा धंदा सध्या तोट्याचा झालेला आहे. शासन एखादा निर्णय ज्यावेळेस करते त्यावेळेस त्या निर्णयाच्या अंमलबजावणी करणे हे सर्व यंत्रणेचे काम असते परंतु आज या संस्था कोणाच्याही दबावला भिक घालत नाही जे संघ यापुढे दुधाला 34 रुपये दर देणार नाहीत त्यांचे परवाने निलंबित करून ते संघ शासनाने ताब्यात घ्यावेत असे निवेदनात नमूद केले आहे.


यावेळी माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने-देशमुख जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव युवा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, विधानसभा प्रमुख साहिल आतार, डॉ. धनंजय म्हेत्रे,ग्रामपंचायत सदस्य रणजीत ठवरे जब्बार आतार, शैलेश भाकरे, संजय भाकरे, सचिन बोरकर, मुसा शिंदे, दादा काळे, बंटी माने,शुभम माने,राजेश खरात शिवाजी वाघमारे गणेश वळकुंडे मायाप्पा सुळे, विजय वाघबंरे किशोर गोरवे, संदीप कपने आदि कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते..


माळशिरस तालुक्यातील दूध संघ चालक जाणीवपूर्वक दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 ते 27 रुपये इतका कमी दर देऊन लूटमार करून शासनाच्या जीआर ला हरताळ फासत आहेत शेतकऱ्याला लुटणाऱ्या व शासनाच्या जीआर चे उल्लंघन करणाऱ्या दूध संघांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांची आजपर्यंत लुटलेला रक्कम तात्काळ दूध संघाने द्यावी यासाठी आंदोलन उभे करणार असून मुजोर दूध संघ चालकांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी गाठ आहे


अजित बोरकर ,तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा