Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

साहित्यिक "गणपत जाधव "यांच्या "हावळा" कथा संग्रहास भी. ग.रोहमारे -ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर.

 


उपसंपादक----नुरजहाँ शेख.

टाइम्स 45 न्युज मराठी.

              माळशिरस तालुक्यात शिक्षक पदावर कार्यरत असणारे महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, गणपत जाधव यांच्या *हावळा* या कथासंग्रहास भि. ग. रोहमारे ट्रस्ट कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.



            साहित्यिक गणपत जाधव हे महाराष्ट्रातील नामवंत असे कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे कावदान, झांजड, हावळा असे तीन कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कथासंग्रहांना या अगोदर वारणेचा वाघ फाउंडेशन वारणानगर यांचा वारणेचा पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा शंकर खंडू पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा बार्शी यांचा शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार ,मराठी वांग्मय परिषद बडोदे गुजरात यांचा अभिरुची गौरव पुरस्कार, अंकुर साहित्य संघ अकोला यांचा अंकुर वांग्मय पुरस्कार, शब्दगंध साहित्यिक परिषद अहमदनगर यांचा पारूबाई काकडे शब्दगंध साहित्य पुरस्कार, शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांचा तापी- पूर्ण साहित्य पुरस्कार, मनोहर सामाजिक प्रतिष्ठान लातूर यांचा रमाई कथा पुरस्कार, डॉ. दत्ता भोसले जिव्हाळा साहित्य पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.


           महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा भि.ग.रोहमारे ट्रस्ट कोपरगाव यांचा यंदाचा उत्कृष्ट कथासंग्रहासाठीचा पुरस्कार गणपत जाधव यांच्या हावळा या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. रोख रक्कम 15000 सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मानाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनच वर्षाव होत आहे.


"*साहित्यिक गणपत जाधव यांच्या "हावळा" कथासंग्रहास भि.ग.रोहमारे ट्रस्ट चा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबाद्दल "टाइम्स 45 न्युज मराठी"च्या वतीने हर्दिक शुभेच्छा.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा