विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
रुपाली विकास पवार रा. माळीनगर ता. माळशिरस जिल्हा सोलापूर येथील शेतकरी कुटूबातील शेतीवर अवलंबून असणारी सर्वसाधारण महिला ! कुटूबाचे नावे माळीनगर येथे ३ एकर शेती व त्यावर कुटूबाचा उदर्निर्वाह . शेती व उत्पादन हवामान घटक वातावरण बदल , बाजारभाव, वाढलेल्या निविष्ठा व मंजूरीचे भाव , लाईट पुरवठा इत्यादी प्रश्नांनी ग्रासलेली जखडलेली . तुटपुजे उत्पादन वर्षाकाठी हरभारे खाल्ले हात कोरडे या उक्तीप्रमाणे स्थिती पतीराज विदयुत मंडळात अंशकालीन कर्मचारी त्यावर घर, शिक्षण ' लग्न समारंभ दवाखाना व उदरनिर्वाह खर्च कसलाच मेळ, रोजमेळ बसत नव्हता . लहानपनापासून इतरापेक्षा वेगळे काहीतरी करून दाखविण्याची ' स्वतःचे पायावर उभे राहण्याची जिद्द ही जिदद मधून उदयोजक उदयोगी, उत्पादक मालक बनण्याची महत्वकांक्षा मला शांत बसू देत नव्हती. एकेदिवशी शेतातील काम संपल्यावर शेतातील लिबाच्या झाडाखाली एकटी बसली असता मनात काहीतरी करण्याचे विचाराचे वादळ काहूर ,
यामधून एक ‘निर्णय झाला की आपल्या भागात सहज उपलब्ध होणाऱ्या , कमी खर्चिक , लोकांच्या आरोग्याचे दृष्टीने महत्वाचे ‘, कमी भांडवल, घरातील सदस्याना तसेच बाहेरील बेरोजगार यांना रोजगार निर्मिती देणारा कमी जोखीम , ‘सतत मागणी असणारा , या मध्ये ‘ततोतंत बसणाऱ्या उदयोगाचे शोधात होती. गरज ही शोधाची जननी असते ! केल्याने होत आहे रे अधी केलीची पाहिजे या उक्तीप्रमाणे मनाचा विचार पक्का झाला . आरोग्य ‘, आहार दृष्ट्या अन्यन्यसाधारण महत्व असलेल्या तृणधान्य प्रक्रिया व मुल्यवर्धन वर आधारित उदयोग करण्याची खुनगाठ बांधली व गौरी सोहम पौष्टीक तृणधान्य प्रक्रिया उद्योगाचा जन्म झाला . ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील चोखळदंत ग्राहक यांची गरज भागविण्यासाठी बाजरी, मका, ज्वारी खपली गव्हू पीठ शहरात पुरवठा करणेसाठी जूनी चक्की घेऊन व्यवसाय सुरु केला . त्याचबरोबर घरी घरगुती पद्धतीने साजूक ‘तुपातील याच्या कुकीज बनवून सुरुवात केली . मागणी वाढली पुरवठा व मागणी यातील दरी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याचे ठरविले. याची पूर्तता साठी घरातील सासू सासरे , पती ,मुले विशेषता माझे मामा श्री तात्यासाहेब फडतरे यांनी माणसिक समाजीक, आर्थिक आधार दिला. बेकरी कुकीज उदयोगात जीवघेणी स्पर्धा ‘व भांडवल कमरतता अर्थसहाय्य अभाव होता . प्रयत्नांती परमेश्वर ! याप्रमाणे कृषि विभाग व अधिकारी दत्त म्हणून उभे राहिले व मार्ग दाखविला व पंतप्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग चा अर्ज भरला . उदयोजक होण्याची इच्छा , महत्वकाक्षा , प्रयत्न, सचोटी कुटूबाचे पाठबळ ‘विश्वास , धैर्य व सततचा सर्व बॅक पाठपुरावा आधारे बॅक ऑफ बडोदा चे व्यवस्थापक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन निकड ,गरज धडपड बघून बॅकेने १२ .५३ लाख किमंतीच्या प्रकल्पला मजूरी दिली यामुळे माझा आनंद गगनात मावेना असा झाला. उत्साह वाढला उमेद उचावली बुडत्याला काडीचा आधार झाला व कबर कसली ! पौष्टीक तृणधान्य मध्ये जास्त सेल्फ लाईफ , प्रतवारी , उत्तम दर्जा गुणवाता असलेले दर्जेदार बेकरी उत्पादन बनविण्याचा मुहर्तमेढ रोवले गेल. गौरी सोहम गृहउद्योग मध्ये पौष्टीक तृणधान्य मधील नैसर्गिक प्रिझरव्हेटीव वापरून बाजरी, ज्वारी , नाचणी , रागी, राळा , खपली गव्हू यांची वैयक्तीक व मिश्रणाची कुकीज बिस्कीटे , नानकटाई,ब्रेड स्वच्छ तेला प्राधान्य देऊन बनविण्यास शुभारंभ केला . दरम्यानचे काळात आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून २०२३ घोषीत झाले यामध्ये कृषि विभागाने त्याचे आहरातील महत्व वैद्यकिय महत्व बाबत मोठ्या प्रमाणावर प्रचार , प्रसिद्धी , प्रसार केल्याने शहरी व ग्रामीण भागात खुप मोठ्या प्रमाणावर जागरुकता झाली व यामुळे मागणीचा आलेख सरळ रेषेत वर चढत राहीला यामुळे बुडत्याला काडीचा आधार मिळाला. १२ .५३ लाख प्रकल्प खर्चापैकी बॅकेने ९लाख कर्ज मंजूर केलेले पैकी १ वर्षातच बॅकेचे २ .३८ लाख भरण्यास यश आले व केंद्रशासन ची पीएमएफएमई ची ४.३८ लाख अनुदान मिरर खाते मध्ये जमा झाल्याने माझे एवढ्या रक्कमेवरील व्याज वाचल . शेतकरी मेळावे , प्रदर्शन , महिला स्वयसहाय्यता गट मेळावे , प्रशिक्षण वर्ग, मुंबईपुणे फुड प्रदर्शन , भीमथडी प्रदर्शन एसआयएसी दिल्ली प्रदर्शन केव्हीके मेळावा यामध्ये माझे ‘ तृनधान्य आधारीत कुकीज प्रचार प्रसार व प्रसिद्धी झाली यामुळे याची मागणी खुप वाढली . यामुळे गौरी सोहम उद्योगाची वाटचाल गतिमान झाली उलाढाल वाढली . बाजारपेठेत टिकून राहणेसाठी अन्नभेसळ उदमआधार ‘, जीएसटी परवाने काढून फार्म प्राऊड ट्रेड मार्क करून मार्केटिग सुरु केले . मागणी व पुरवठा ची दरी कमी करण्यासाठी घरातील ४ सदस्या बरोबर बाहेर ४ महिलाना रोजगाराची संधी उपलब्ध झाली . स्वछता आकर्षक पैकिंग , दर्जेदार उत्पादन, वाजवी किमंत , प्रिझरव्हेटीव्ह विरहीत , उत्कृष्ट पौष्टिक तृणधान्य कुकीज ची मागणी मुंबई पुणे, कोल्हापुर , अमरावती नागपूर , नाशिक ‘ हैद्राबाद मुंबई मंत्रालय उपहारगृह मधून मोठ्या प्रमाणावर मागणी चालू आहे. आता ‘तर माझी कुकीज सातसमुद्रापार दुबई ही निर्यात होत आहे हे माझे दर्जेदार उत्पादनाचे रहस्य आहे. स्वातंत्रयाच्या अम्रत महोत्सवात ‘ मेक इन इंडीया, व्होकल फॉर लोकल या ब्रीद वर काम करण्याची संधी मिळाली त्याचा मला सार्थ देशासाठी अभिमान स्वाभिमानव गर्वआहे . बॅक कर्ज मुद्दल + व्याज कच्चामाल खर्च, विदयुत खर्च, पॅकिग, वहातुक , रोजगार इत्यादी वजा जाता कुटूबातील ४सदस्य व बाहेरील प्रत्यक्ष ४ सदस्य व अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती करण्यात यश आले आहे या सर्वाचा खर्च वजा जाता मला प्रति महिना २५ हजार रुपये पर्यत निव्वळ शिल्लक राहत आहेत . अशाप्रकारे एक मेका साहय करू अवघे धरु सुपथ ! या म्हणीप्रमाणे सबका साथ सबका विकास या ब्रीद प्रमाणे पीएमएफरएमई अनुदान , कृषि विभाग सल्ला मार्गदर्शन प्रोत्साहान’ घरातील सर्व सदस्यांचा विश्वास नातेवाईकाचे पाठबळ बैक अर्थसहाय्य , चोखळदंत गि-हाईक , दर्जात्मक उत्कृष्ट नैसर्गिक पौष्टीक तृणधान्य मुल्यवर्धन उत्पादने मु ळे मी मागे वळून न पाहता यशाची शिखर सर केले व माझे उदयोजक व्होण्याचे स्वप्न साकार झाले . मी या यशोगाथे द्वारे संबोधीत करते की जिद्द , चिकाटी , सकारात्मक विचार, प्रयत्न ‘, सातत्य, पराकाष्ठाता ,परिश्रम कामाशी प्रमाणिक ‘ दर्जेदार उत्पादन , शासन अनुदान , कृषि विभाग सल्ला मार्गदर्शन साथ यामुळे यश पायशी खेळते राहील व यशस्वी उदयोजक होण्याचे स्वप्न सकार होण्याबाबद तीळ मात्र शंका नाही!! जय जवान जय किसान जय विज्ञान !
रुपाली पवार --गौरी सोहम गृहउदयोग, माळीनगर फार्म प्राऊड !
शब्दांकन व संकलन --सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी नातेपुते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा