इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- टणू (ता.इंदापूर) येथे बिबट्याचा बछड्यांसह वावर वाढल्याचे त्यांच्या पायांच्या ठशावरून निष्पन्न झाले आहे. दरम्यान इंदापूर वन विभागाच्या पथकाने पाहणी करून बिबट्याचा वावर असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे टणू परीसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टणू परीसरात (दि.२) दुपारी चारच्या सुमारास बावडा नरसिंहपूर मार्गालगतच्या ऊसाच्या शेता जवळ जनावरे चारणाऱ्या सुरेखा मोहिते यांचे समोर बिबट्या काही अंतरावर येवून काही क्षण पाहतच उभारला होता. त्यामुळे सुरेखा मोहिते यांची त्याला पाहताच भंबेरी उडाली. त्या आरडाओरडा करत रस्त्याकडे पळाल्याने बिबट्या गायब झाल्याचे सुरेखा मोहिते यांनी सांगितले.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संदीप मोहिते यांनी मुख्य वनसंरक्षक पुणे विभाग व उप वनसंरक्षक पुणे व तहसीलदार श्रीकांत पाटील यांना या संदर्भात कळवले. त्यानंतर सायंकाळी वन विभागाचे अनंता एम. हुकेरे, व्ही. ए. शेटे, बाळासाहेब वाघमोडे, तर तलाटी शिवाजी बिराजदार यांनी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देवून बिबट्याचा वावर असणाऱ्या जागेवरील ठशांची पाहणी केली. तेव्हा बिबट्याचा वावर असल्याचे मान्य केले आहे.
इंदापूर वनक्षेत्रपाल अनिल सुर्यवंशी यांना या संदर्भात विचारणा करण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी उचलला नाही. तर टणू ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी तेजस मोहिते यांनी यासंदर्भात सांगितले की आम्ही ग्रामस्थांना सदर बाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून ज्यांना कोणाला बिबट्या नजरेस पडल्यास त्यांनी त्वरेने आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
चौकट - टणू परीसरातील शेतात बिबट्या व त्यांच्या बछड्यांचा वावर असल्याचा निष्पन्न झाले असताना इंदापूर वन क्षेत्रपालाला कर्तव्याबाबत गांभीर्य नसल्याचे प्रशासनातही सुर दिसून आला. स्वता भेट देण्याऐवजी इतर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणावर पाठवून नुसती पाहणी करून माघारी बोलावले. परंतू त्यावर उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण व वन विभागाच्या कार्यकर्तव्याबाबत चिड निर्माण झाली आहे.
फोटो - टणू ( ता.इंदापूर ) येथे बिबट्याचा बछड्यासह वावर असल्याचे ठशावरून निष्पन्न झाले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा