Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

चेअरमन राजेंद्र गिरमे उर्फ रंजनभाऊ का बिथरलेत ?

 


पञकार---डी.एस .गायकवाड .

    - हक्काची माळीनगर ग्रामपंचायत ताब्यातून गेल्यामुळे वैफल्यग्रस्त होत दि सासवड माळीनगर फॅक्टरी शुगरचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे हे लाख दोन लाखाच्या लीडच्या वल्गना करताना दिसत आहेत. आता आपल्या गावात सुद्धा मोहिते पाटील यांनाच लीड मिळणार आहे अशी प्राप्त परिस्थितीची त्यांना कल्पना आहे मात्र ग्रामपंचायतीचा बदला ते अशा रीतीने बोलून तर घेत नाहीत ना ? असा सवाल विचारला जात आहे.

माळीनगर फेस्टिवलच्या निमित्ताने माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळीनगर कारखान्याचे चेअरमन रंजनभाऊ यांनी फेस्टिवल साठी आमंत्रित केले होते. सदर कार्यक्रमात बोलताना रंजनभाऊंनी पुढे कोण का असेना आम्ही निंबाळकर यांनाच मदत करणार अशी घोषणा करत त्यांनी थेट मोहिते पाटील यांना अंगावर घेतले आहे... याची कारणीमामांसा शोधली तर नुकत्याच झालेल्या माळीनगर ग्रामपंचायत वर मोहिते पाटील यांनी निर्विवाद निर्माण केलेले वर्चस्व हे वाटते... यामुळे रंजनभाऊ हे पूर्णपणे व्यथित झालेले दिसत आहेत... आणि यातूनच ते लाख दोन लाखाच्या लीडच्या घोषणा ठोकताना दिसत आहेत.. मुळात आता पाच राज्याच्या झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने मिळवलेले अद्वितीय यश...यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक फेरबदल महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा पहावयास मिळणार आहेत...अनेक राजकीय विश्लेषक सुध्दा अगदी खात्रीने माढा लोकसभा मतदार संघात आता भाजपाचा नवीन चेहरा पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करत असताना... रंजनभाऊ मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पराभवाचे उट्टे...अशी वक्तव्य करून काढताना दिसत आहेत...माळीनगर ग्रामपंचायत हातची निघून गेल्याने खासदार निंबाळकर यांना आणून मोहिते पाटील यांना खिजवीण्यासाठी अशी वक्तव्य बाहेर येत असल्याची सध्या चर्चा आहे. याने काहीही फरक पडणार नाही मात्र रंजनभाऊ का बिथरलेत असा सवाल मात्र यानिमित्ताने विचारला जात आहे.. असो..असे बरेच खेळ पुढे सुद्धा पहावयास मिळणार आहेत....

- डी एस गायकवाड पत्रकार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा