*संपादक---- हुसेन मुलाणी*
*! टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील तथा बाळदादा यांचा नुकताच ७४वा वाढदिवस होऊन ७५व्या अमृत महोत्सव कडे वाटचाल सुरु झाली. त्याच निमित्ताने जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या झी मराठीवर "चला हवा येऊ द्या" हा कार्यक्रम होत असताना त्यामध्ये सागर कारंडे यांनी अरविंद जगतापांची अनेक पत्र वाचून दाखवली होती. त्याच पध्दतीने प्रशालेच्या वतीने ७५ शुभेच्छा पत्रं दादांना पाठवण्यात आली, त्यातीलच एक जयसिंह मोहिते पाटील यांचा जीवनपट सांगणारं पत्र. १९९९ च्या आनंद यात्रेपासून आजपर्यंतच्या दादांच्या जीवन प्रवासातील अनेक गोष्टी त्याच्यामध्ये वर्णन केल्या आहेत. पत्र देताना प्रशालेतील विद्यार्थिनी गौरी पराडे हिने पोस्टवुमन ची भुमिका साकारली आणि दादांना पत्र देत एक पत्र वाचुन दाखवण्याची परवानगी मागितली आणि पत्र वाचन केले, त्यावेळेस दादा सुद्धा भावुक झाले. त्यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका वाघ मॅडम सहशिक्षिका कनबुर मॅडम, तानाजी भोसले सर रोहित माने सर आदि उपस्थित होते. पत्र वाचन गौरी सुधाकर पराडे हिने तर पत्र लेखन रोहित माने सर यांनी केले ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा