*टाइम्स 45 न्युज मराठी*.
अजितदादा पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्हांवर निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगासमोर या सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अजितदादा गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रतिवाद केला. दरम्यान, आजच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला असून येत्या दोन ते तीन आठवड्यात निकाल येण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, केस आज युक्तिवाद स्तरावर संपली आहे. निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला आहे. तसेच आमचे मत लेखी स्वरूपात द्यायला सांगितले आहे. त्यामुळे आता निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे. परंतु, अजितदादा गटाकडून स्पष्ट आले आहे की, संघटनेचे मत विचारात घेऊ नका. त्यामुळे हे स्पष्ट होते की त्यांच्याकडे संघटना नाही, हे त्यांच्या हरण्याचे द्योतक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा