Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

*ई.व्ही.एम ,ला विरोध असताना पंतप्रधान, नरेंद्र मोदी व भाजप मतपत्रिका वापरून मतदान घेण्यास का घाबरतात?*

 


*श्रीपूर---बी.टी.शिवशरण.*

आज देशभरात भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना लहान घटक यांचा ईव्हीएम मशीनला कडाडून विरोध आहे जर भाजपने देशात सर्वसामान्य विकास प्रगती केली असेल तांत्रिक पातळ्यांवर अनेक बदल मोठा विकास केला आहे तर त्यांना त्या विकासाच्या जोरांवर देशात कोणत्याही निवडणुकीमध्ये सामोरे जायला कसली भिती वाटते त्यांचा ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्याचा अट्टाहास कशासाठी एरवी उठसूठ साधनशुचिता प्रामाणिक व कर्तव्य कठोर गप्पा मारल्या जातात मग भाजप वगळता इतर सर्वांचा ईव्हीएम ला विरोध आहे तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप विरोधकांचे आव्हान स्वीकारुन लोकसभा निवडणूक मतपत्रिकेवर का घेत नाहीत जगात आपली प्रतिमा सोज्वळ निर्भीड व लोकप्रिय आहे असे पंतप्रधान यांनी देशपातळीवर निर्माण केली आहे त्यांचे कार्यकर्ते पक्ष देशातील सामान्य लोक व मतदारांत असा भास आभास निर्माण करतात की नरेंद्र मोदी यांचे शिवाय देशात आता कोणी खंबीर नेतृत्व असलेला कोणीच नेता राहिला नाही येत्या लोकसभा निवडणुकीत चारशे च्या पार खासदार निवडून आणण्याचा त्यांनी चंग बांधला आहे त्यांनी चारशे खासदार निवडून आणावेत पण या वेळी लोकसभा निवडणूक ईव्हीएम वर न घेता मतपत्रिका वर घेण्याचे धाडस करून निवडणुका जिंकावी जर भाजप देशात सर्व पातळ्यांवर कोणतेही काम विनासायास व नरेंद्र मोदी यांचं नाव वापरून सहज सोपे करत आहे अशी त्यांची धारणा आहे तर नरेंद्र मोदी यांचे नांव व मतदान मतपत्रिका वर घेऊन त्यांनी त्यांचे स्थान भक्कम करायला काय हरकत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा