Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

*सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमा विभागीय स्पर्धा संपन्न*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

              अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर - अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. २३.०१.२०२४ रोजी इंटर इंजिनिअरिंग स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत सी झोन विभागातील वेटलिफ्टींग व कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, सदर स्पर्धेसाठी विभागातील १० महाविद्यालयातील ४५ विद्यार्थ्यांनी वेटलिफ्टींग तर ३५ विद्यार्थ्यांनी कुस्ती या क्रिडा स्पर्धेत सहभाग नोंदविला.



यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री वसंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

वेटलिफ्टिंग या स्पर्धेमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज मधील द्वितीय वर्ष मेकॅनिकल विभागातील विध्यार्थी चि. प्रथमेश तानाजी माने - देशमुख हा ७० किलो वजनी गटामध्ये प्रथम तर ८५ किलो वजनी गटामध्ये प्रथम वर्ष संगणक विभागामधील विध्यार्थी चि. शिवतेज विक्रम सिंह माने - देशमुख प्रथम आला आहे. तसेच कुस्ती या स्पर्धेमध्ये ७४ किलो वजनी गटांमध्ये द्वितीय वर्ष मेकॅनिकल विभागातील विध्यार्थी चि. प्रथमेश तानाजी माने देशमुख याने द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. 



विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय अध्यक्ष श्री. जयसिंह शंकरराव मोहिते - पाटील व महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते - पाटील यांनी विशेष कौतुक केले.

 स्पर्धेवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, क्रीडा समन्वय प्रमुख प्रा. रविकांत देशमुख व प्रा. मारुती शेंडगे, कार्यालयीन अधीक्षक श्री. शब्बीर शेख आदी उपस्थित होते. स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे सुयोग्य मार्गदर्शन व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा