*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
सन १९९२ साली दहावीच्या वर्गात शिकणारे २७ वर्गमित्र जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या निमीत्ताने ३२ वर्षानंतर एकत्र आले.आनेक वर्षाच्या भेटीमुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद ओसडून आला होता.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला शंकरनगर येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी (ब) या वर्गात सन १९९२ मध्ये सुमारे ५० हुन अधिक विद्यार्थी एकत्रीत शिक्षण घेत होते.दहावी बोर्डोची परीक्षा पार पडल्यानंतर,उत्तीर्ण झालेले वर्गमित्र पुढे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणासाठी गेले तर काहींनी शिक्षण थांबवले.पुढे हे सर्व वर्गमित्र आपापल्या शिक्षणानंतर लग्न करुन नौकरी,व्यवसाय व संसाराच्या वर्गात रमुन गेले. मोबाईलच्या जमान्यापूर्वी यातील काहीजण एकमेकाच्या संपर्कात होते तर काही संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले होते.
संसाराच्या वर्गात रमलेल्यांना या वर्गाच्या बाहेरील, दहावीच्या वर्गात शिकणारे आपले संगडी कधी एकत्रीत भेटतील असे चुकुनही वाटले नसावे.परंतु आधुनिक युगात मोबाईलचे आगमन झाले आणि सोशल मिडीयातुन जगतला दुरवरचा माणुस जवळ आला.सोशल मिडीयाचा सदुपयोग करत सन १९९२ ला इयत्ता १० वी (ब) या वर्गातल्या संभाजी निंबाळकर यांनी व्हाट शापच्या माध्यमातून शक्य तितक्या वर्गमित्राचे संपर्क करून व मोबाईलचा नंबर मिळवून,व्हाट शाप ग्रुपच्या माध्यमातुन संसाराच्या बाजारात हरवलेल्या वर्गमित्रांना पुन्हा एका वर्गात एकत्र आणून बसवले.गेले वर्ष-दिड वर्ष व्हाट शाप ग्रुपच्या माध्यमातुन एकमेकाशी संवाद साधत एकत्रीत येण्याचे नियोजन पुर्ण होत नव्हते.
यामधील विझोरी येथे राहणारे एक वर्गमित्र इंजिनीअर हरीश्चंद्र इंगळे यांनी जागरण- गोंधळाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण व्हाट शाप ग्रुपच्या माध्यमातुन दिले.हे निमंत्रण देत असताना विस्कटलेले मित्र एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रीत येतील अशी खात्रीच नव्हती परंतु एरव्ही जागरण-गोंधळाचे जेवन करण्यासाठी आवर्जून जाणारे परंतु यावेळी जेवनापेक्षा जुने संवगडी भेटणार या आनंदाने कडाक्याच्या थंडीत करमाळा, वडूज व माळशिरस तालुक्यातील वेगवेगळ्या गावतील सगळे वर्गमित्र एकत्र आले.तब्बल ३२ वर्षानंतर सर्व मित्र एकत्रीत आल्याने सर्वांचा आंनद द्विगुणित झाला होता,जुन्या आठवणींना उजाळा देत रंगलेल्या गप्पा जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.मनसोक्त गप्पा आणि वर्गमित्र इंजि.हरीश्चंद्र इंगळे यांनी जागरण-गोंधळाच्या निमीत्ताने दिलेल्या रुचकर स्नेह भोजनाचा मनमुराद आनंद घेत आठवणीचे क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपुन पुन्हा लवकरच भेटू म्हणत निरोप घेतला पुन्हा भेटण्याचा निश्चय करुन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा