*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो.9730 867 448
(१) मराठा आरक्षणाची लढाई म्हणजे 'चार आणे की कोंबडी, बारा आणे का मसाला' असेच झाले आहे. 'बारा आणे का मसाला' खर्चिला पण 'चार आणे की कोंबडी' अजूनही हाती लागली नाही. हा पराजय आणि या पराजयाची कारणे शोधून मान्य करावीत.
(२) या लढाईत शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान हमीभावाची मागणी तसेच सार्वजनिक क्षेत्रातल्या खाजगिकरण आणि नोकऱ्यांतील कंत्राटीकरणाच्या धोरणाला विरोधाची जोड देणे आवश्यक होते व आहे. हे पूर्वीही मांडले होते, आजही मांडत आहे.
(३) क्रांतीची तलावर ही विचारांच्या सहानेवर परजली जाते असे भगतसिंग म्हणाले होते. मराठा कल्याणाच्या लढाईची तलवार विचारांच्या सहानेवर परजली पाहिजे. विचारांना अव्हेरुन केवळ अस्मितेच्या वादळावर ही लढाई यशस्वी करता येणार नाही.
(४) प्रस्थापित, आजी-माजी सत्ताधारी, धनिक व भट धार्जिन्यांच्या भजनी लागून ही लढाई जिंकता येणार नाही. या लढाईचे नेतृत्व गरजवंत मराठ्यांनाच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक अस्तित्वाच्या संघर्षाची जाण ठेवून करावे लागेल.
(५) मराठा कल्याणाच्या लढाईला सर्वसमावेशक करीत, तिला जात-अस्मितेच्या पलिकडे नेत सर्वहारा वर्गाच्या उदयाची लढाई करावी लागेल. मराठा ही केवळ जात नसून ती अन्याय, शोषण आणि जुलमाविरुद्ध लढणारी वृत्ती आहे, असे इतिहास सांगतो. ती प्रेरणा आजच्या ब्राह्मो-भांडवली अन्यायी, विषम व्यवस्थेला उलथवण्यासाठी पुन्हा जागवावी लागेल.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)
(टीप: यापूर्वी मराठ्यांसाठी ११ कलमी कार्यक्रम मांडला होता. पण जात-अस्मितेच्या वावटळीत तो दुर्लक्षिला गेला. आता तरी मराठे या पंचसुत्रीची दखल घेतील व आपापल्यापरिने त्यात सुयोग्य भरही घालतील या भाबड्या आशेपोटी केलेला हा प्रपंच आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा