*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या रत्नाई कृषी महाविद्यालयामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी डॉ. लक्ष्मण आसबे सर,अध्यक्ष - कामधेनू सेवा परिवार हे प्रमुख शिवव्याख्याते म्हणून लाभले.
सकाळी महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी आनंदी गणेश मंदिर येथून शिवज्योतीचे पूजन करून भव्य मिरवणूक काढली.महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली .
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते काकासाहेब आणी अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी,प्राध्यापक यांनी महाराजांविषयी मनोगते व्यक्त केली.
शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मण आसबे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सखोल इतिहास सांगितला ज्याला भूगोल माहित आहे त्याला इतिहास समजतो, ज्याला इतिहास कळला त्याला वर्तमान काळाची किंमत कळते आणि ज्याला वर्तमान काळाची किंमत कळते त्यांचे भविष्य उज्वल असते या संकल्पनेतून महाराजांचे त्यांच्या ५० वर्ष आयुष्यातील पराक्रमाचे विविध दाखले देत विद्यार्थ्यांना वर्तमान व भविष्यकाळाविषयी जागृत केले. महाराजांना प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक इत्यंभूत माहिती असे, त्यांची वेगवान निर्णय क्षमता, गनिमीकावा काव्याचे तंत्र यांच्या साह्याने थोडक्या मावळ्यांसोबत आदिलशाही व मुघल फौजांचा यशस्वी सामना केला.रामायण, महाभारत,युद्ध कला,पूर्ण समुद्र माहिती,खगोलशास्त्रीय माहिती इत्यादी 32 प्रकारच्या विद्या शिकवण्यासाठी २२शिक्षक होते. भारतीय आरमाराचे जनक असणाऱ्या महाराजांनी केलेल्या अफजलखानाच्या वधाची युद्धनीती ही अमेरिकेतील सैनिकांनाही आज शिकवली जाते.यावरून त्यांनी महाराजांचे सर्व गुण संपन्न संघटन कौशल्य व आकलन क्षमता या विषयावर मार्गदर्शन केले.अशा या पराक्रमी महापुरुषासाठी ते म्हणतात, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराजांचे आयुष्य आहे आणि हे आयुष्यमान भव या अर्थात सार्थ करणारे वय आहे.शेवटी डॉ. आसबे सरांनी विद्यार्थ्यांना गड किल्ले भेटी देऊन त्यांचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य नलावडे सर यांनी महाराजांच्या निर्धार,परिश्रम, चारित्र्य, देशप्रेम,नेतृत्वगुण इत्यादी गुणांची,मूल्यांची जाणीव करून दिली व त्याद्वारे प्रेरित होऊन चारित्र्यसंपन्न,कर्तृत्ववान जीवन जगावे असे आवाहन केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच हा कार्यक्रम प्रा.एस.आर.आडत,प्रा.एन.बी.
गाढवे,प्रा.पी.एस.पांढरे आणि इतर प्राध्यापक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सहकार्याने संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा