*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर अंतर्गत महिला सशक्तिकरण करिता मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प या अंतर्गत माळशिरस तालुक्यातील सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र व विठाई लोक संचालित साधन केंद्र पंढरपूर या लोकसंचालित साधन केंद्रामार्फत दिनांक १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये तालुकास्तरीय विक्री प्रदर्शनाचे आयोजन विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुलात करण्यात आले होते
या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.१५ फेब्रुवारी रोजी आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ.रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पदाधिकारी व अधिकारी यांना बचत गट निर्मित उत्पादित वस्तूंच्या विक्रेत्याला भेट दिली या प्रदर्शनास अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिह मोहिते पाटील,डाॅटर माॅम फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शितल देवी मोहिते पाटील,सौ.वैष्णवी देवी मोहिते पाटील,माजी पंचायत समिती माजी सदस्य यांनी भेट देऊन महिलांना प्रोत्साहन दिले व वस्तू खरेदी केल्या या चार दिवसीय प्रदर्शनाच्या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये महिलांना सक्रिय सहभाग घेतला होता.यामध्ये दांडिया,संगीत खुर्ची,डान्स,ग्रुपडान्स यासारखे कार्यक्रम घेण्यात आले.त्यामध्ये सर्व महिलांनी सक्रिय सहभाग घेतला होता.महिलांना घराच्या बाहेर पडून सांस्कृतिक कार्यक्रममध्ये भाग घेण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये एकूण ५८ स्टॉल धारक यांनी सहभाग नोंदवला होता व त्या सहभागाच्या माध्यमातून खूप चांगला प्रतिसाद या स्टॉल धारकांना भेटला आहे.यामध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थ,लाकडी खेळणी, महिलांनी बनवलेल्या घरगुती वस्तू व विणकाम यांची प्रचंड प्रमाणात विक्री झाली.या प्रदर्शनाच्या माध्यमातून साधारणपणे आकरा लाखपेक्षा जास्त विक्री झाली.या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे मार्केटिंग देखील चांगल्या प्रमाणात उपलब्ध झालेले असून अकलूज शहर व संपूर्ण तालुक्यामधील महिलांनी या प्रदर्शनामध्ये खरेदीचा सहभाग नोंदवला.
बचत गटात निर्मित सर्व वस्तूंचा दर्जा हा चांगल्या प्रमाणात होता.असा सर्व नागरिकांकडून चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद लाभला माळशिरस तालुक्यातील सर्व गावांमधून महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित असणाऱ्या बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदवला.
सर्वसाधारणपणे चार दिवसांमध्ये एकूण २६ हजारापेक्षा जास्त ग्राहकांनी या विक्री प्रदर्शनामध्ये खरेदीचा व भेटीसाठी सहभाग नोंदवला.चार दिवसीय प्रदर्शनाचे सांगता समारंभ दिनांक १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.यासाठी माळशिरस तालुक्याच्या माजी पंचायत समिती सदस्य वैष्णवी देवी मोहिते पाटील उपस्थित होत्या.त्याच प्रमाणे सुनंदाताई फुले माजी जिल्हा परिषद सदस्य व संगीताताई मोटे माजी जिल्हा परिषद सदस्य या देखील उपस्थित होत्या.विक्री प्रदर्शनामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्टॉल धारकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या महिलांचा देखील या ठिकाणी गौरव करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा