*श्रीपूर-----बी.टी.शिवशरण
येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे महायुतीकडून आज माध्यमातून सांगण्यात आले भाजप बत्तीस एकनाथ शिंदे शिवसेना बारा व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा अशा जागा दिल्या असल्याचे सांगण्यात आले मात्र महायुतीचा एक घटक असलेले आरपीआय आठवले गटाला यातून वगळण्याचे दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आरपीआयचे कार्यकर्त्या तून संतापाची भावना पहायला मिळाली महाराष्ट्रात आरपीआय आठवले गट गेल्या दहा वर्षांपासून भाजप बरोबर युतीत सहभागी आहे
आरपीआय आठवले गटाची महाराष्ट्रात मोठी ताकद आहे कार्यकर्त्यांची मोठी फळी सक्रिय आहे महाराष्ट्रातील विधानसभा लोकसभा निवडणुकीत आरपीआय आठवले गट ज्या पक्षा बरोबर युतीत सहभागी असतो त्यांना राजकीय फायदा होतो असे आजपर्यंतचे राजकीय आडाखे यशस्वी ठरले आहेत जर आरपीआय आठवले गटाला महायुती किमान दोन जागा सोडण्याची अपेक्षा होती शिर्डी व सोलापूर लोकसभा मतदारसंघात आरपीआयची मोठी ताकद पहायला मिळते या दोन जागा निश्चित निवडून येऊ शकतात जर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून आरपीआयची दखल घेतली गेली नाही तर कार्यकर्त्यांचा उद्रेक झाल्यास महायुतीला निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो पश्चिम महाराष्ट्रात शिर्डी सोलापूर माढा व मुंबईत दक्षिण लोकसभा मतदारसंघ ईशान्य मतदार संघ व अमरावती मध्ये महायुतीचे उमेदवार यांना मोठा धोका होऊ शकतो महायुतीने आरपीआयला वगळल्याने ते स्वःताच्या पायांवर धोंडा पाडून घेऊ शकतात आरपीआय आठवले गट या पक्षाचे जाळे राज्यभरात गावपातळीवर शहरात वस्त्या वाड्यावर पसरले आहे कार्यकर्ते नेते व्यापक व विस्तारित नेतृत्वाखाली सक्षम झाले आहेत त्यामुळे त्यांना मोकळ्यात जमेला धरण्याचे दिवस संपले आहेत गत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आरपीआय आठवले गटाला सहा जागा भाजपने सोडल्याचे अधिकृत जाहीर केले होते आरपीआय आठवले गट कार्यकर्त्यांनी त्या वेळी उद्या सकाळी अकरा नंतर सोडलेल्या जागांवर उमेदवारी फार्म भरण्याची सर्व सोपस्कार प्रक्रिया पूर्ण केली होती उमेदवारी जाहीर झालेले नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तयारी केली होती आणि सकाळीच भाजपचे वरिष्ठ पातळीवरून काय हालचाली वेगात झाल्या आणि आरपीआय आठवले गटाला सहा जागा सोडलेल्या असतानाही त्या सहाही जागेवर भाजपचे उमेदवार लादले व ते आरपीआय आठवले गट यांच्या मदतीने निवडून आले हा कटू अनुभव कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे आता लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यात जर आरपीआय आठवले गटाला सापत्न वागणूक व मागील पाढे पंचावन्न होत असतील तर महाराष्ट्रात किमान सहा जागा लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचा उद्रेक अनावर झाल्यास भुईसपाट होऊ शकतात याचे भान व जाण महायुतीचे नेत्यांनी ठेवावी अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्या तुन उमटू लागल्या आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा