*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.हे शिबीर २० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन प्रा.निलेशकुमार आडत,संचालक आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस अकलूज यांच्या हस्ते करण्यात आले.तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.सुधा बनसोडे होत्या.हे शिबिर प्राणीशास्त्र विभागाच्या विभागाच्या वतीने घेण्यात आले आहे.या शिबिरामध्ये महाविद्यालयातील सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.अर्चना पवार, प्रा.मधुरा देशमुख,बापूसाहेब कदम,महेंद्र साठे व सर्व सहकारी यांनी मदत केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. अश्विनी हेगडे तर आभार प्रदर्शन प्रा.पूजा सावंत यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा