*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळा, अकलूज प्रशालेत आज स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी .रेवंडे सर .तर अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका .शेख मॅडम उपस्थित होत्या.तसेच सर्व इयत्ता प्रमुख उपस्थित होते.प्रथमतः राष्ट्रगीत व राज्यगीत गायन झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरवसे मॅडम यांनी केले.त्याला अनुमोदन क्षीरसागर मॅडम यांनी दिले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सन्माननीय प्रमुख अतिथींचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थीनी कु.स्वराली मोरे हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तसेच चि.यश टिंगरे याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा आढावा आपल्या खणखणीत आवाजात घेतला.तद्नंतर प्रशालेतील शिक्षक .किर्दक सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करुन देऊन महाराजांच्या जीवनावर आधारीत काही प्रसंग सांगितले.
त्यानंतर "शरिर माध्यमं खलु धर्म साधनमं" या वाक्याप्रमाणे प्रत्येक वर्षीप्रमाणे सन २०२३-२४ मध्ये प्रशालेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक खेळ घेण्यात आले.आज या क्रीडा स्पर्धेत क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.क्रीडा विभागाच्या बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन किर्दक सर यांनी केले.
त्यानंतर इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त "गड आला पण सिंह गेला" हा देखावा उत्कृष्ठरित्या सादरीकरण करुन उपस्थित सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यामध्ये शहाजीराजे,जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.देखाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी पोवाडा सुंदररित्या सादर केला.त्याला संगीत विभागाने समर्पक साथ दिली.
त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व वक्ते श्री.रेवंडे सर यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास,आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडुन काय आदर्श घ्यावा याविषयी आपले विचार भारदस्त आवाजात मांडले.तसेच सरांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरवसे मॅडम यांनी केले.तर आभार .किर्दक सर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा