*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
करमाळा तालुक्यातील रस्त्याच्या कामांचे टेंडर निघत नाही आंदोलनफेम जनशक्तीचे अतुल खुपसे-पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. इशाऱ्यानंतर हि कामे सुरु करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आणि यासंदर्भात एका वृत्तपत्रात दि.१३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यंत ऑनलाईन साठी मुदत असल्याचे नमूद केले आहे. मात्र वस्तुस्थिती अशी की हि कामे ऑनलाईन दिसत नाही. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर शंका उपस्थित केली जात आहे तर आंदोलनफेम अतुल खुपसे-पाटील या विषयावर आवाज उठविणार का...? आंदोलन करणार का...? असा प्रश्न विचारला जात आहे.
-श्री.संजय फडतरे-पोमलवाडी
करमाळा तालुक्यातील कोर्टी-दिवेगव्हाण-पारेवाडी रेल्वे स्टेशन ते पोमलवाडी प्रजिमा-124,केतुर -2-केतुर-1-वाशिंबे ते सोगाव प्रजिमा-125,मांजरगाव-कोर्टी जिल्हा हद्द प्रजिमा-192,कुगाव-चिकलठाण-शेटफळ-जेऊर प्रजिमा-11,पारेवाडी-वाशिंबे जाधव वस्ती वड्यावरील पूल अशी कामे मंजूर झाली.करमाळा तालुक्यातील रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली असताना पाच वर्षाच्या आखेरीस निघालेल्या रस्त्यांच्या कामाची टेंडर प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने 13 फेब्रुवारी 2024 रोजी लोकमत पेपर द्वारे प्रसिद्ध केली.या टेंडर प्रक्रियेमध्ये शेवटची मुदत 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.
या रस्त्यांची कामे लोकमत वृतवाहिनी द्वारे 13/02/2024 तारखेला प्रसिद्ध केली खरी परंतु आजपर्यंत ती ऑनलाईन प्रक्रियेत दिसलीच नाहीत.याचाच अर्थ असा होतो की,आपल्या जवळच्या ठेकेदाराला ही कामे मिळाली पाहिजेत.मग ती रस्त्याचे कामे कशी जरी झाली तरी त्याच्याशी यांना काहीही घेणं देणं नाही.आज तालुक्यातील जनता रस्त्याच्या बाबतीत अगदी होरपळून गेलेली असताना या सार्वजनिक विभागाने कोणाच्या सांगण्यावरून टेंडर प्रक्रियेमध्ये अशी आडमूठे पणाची भूमिका घेतली हा सध्या सर्वच ठेकेदारांना न सुटलेला प्रश्न आहे. याचा अर्थ असा होतो की, ही कामे फक्त आपल्या मर्जीतीलच ठेकेदाराला मिळाली पाहिजेत मग ती कामे किती दर्जेदार होतील याच्याशी ना प्रशासनाला काही देण ना प्रतिनिधींना घेणं देणं.
परंतु आंदोलन फेम असणारे अतुल खूपसे-पाटील आज या सार्वजनिक विभागाच्या निर्णयावरती मूग गिळून गप्प बसलेले दिसत असताना.आपल्या स्टाईलने सार्वजनिक बांधकाम विभागावर वारंवार हलगी आंदोलन,मोर्चा,उपोषण करणारे अतुल खूपसे पाटील आज गप्प का..? या विषयावर आवाज उठविणार का...? आंदोलन करणार का..? असा प्रश्न या निमित्ताने पोमलवाडी गावचे युवा नेते संजय फडतरे यांनी उपस्थित केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा