*श्रीपूर---बी.टी.शिवशरण.
श्रीपूर येथील भाजी मंडई मधील व उजनी वसाहत पाण्याची टाकी शेजारी असलेले आरो प्लांट गेल्या दीड वर्षापासून बंद पडले आहेत नगरपंचायत कडे या बाबत स्थानिक नागरिकांनी सदर आरो प्लांट सुरू करण्यात यावेत म्हणून अनेकदा मागणी केली आहे पण दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले पाच रुपये मध्ये दहा लिटर आरोचे पाणी मिळत होते पण ते बंद पडल्यानं काही धंदेवाईकांनी खाजगी आरो प्लांट बसवले आहेत ते दहा रुपयाला दहा लिटर पाणी विकतात नगरपंचायत निवडणुक दरम्यान स्थानिक प्रचार करताना सर्वच नेत्यांनी प्रत्येक वार्डात आरो प्लांट बसवून देऊ असे आश्वासन दिले होते प्रत्येक वार्डात आरो प्लांट बसवले तर नाहीतच पण जे पुर्वी सार्वजनिक आरो प्लांट होते ते सुध्दा बंद पाडण्यात आले आहेत गेल्या वर्षी भाजी मंडई मधील आरो प्लांट बंद पडल्याचे समक्ष महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना दाखवले असता त्यावेळी त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या नगरपंचायत कार्यालय अधीक्षक यांना हा प्लांट का बंद आहे त्वरित दुरुस्त करून तो सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण त्या नंतर नगरपंचायतने कसलीही दखल अद्याप घेतली नाही पुढील महिन्यापासून उन्हाळा सुरू होत आहे त्यामुळे बंद पडलेले आरो प्लांट लवकरच सुरू करुन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा