Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांना मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन .

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

               महाराष्ट्र विधीमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे.या अधिवेशनात सगे सोयरे अध्यादेश काढलेला आहे.त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत विषय मांडू मराठा समाजाला न्याय द्यावा म्हणून मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी आ.मोहिते- पाटील यांना निवेदन देण्यात आले.तसेच अकलूज माळेवाडी येथील राष्ट्रमाता जिजाऊ चौक (बायपास चौक) येथे सुशोभीकरणासाठी निधी मिळाला हि मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड यांची मागणी केली आहे.या दोन्ही मागण्या पुर्ण करण्यासाठी पाठ पुरावा करू असे आ.मोहिते पाटील यांनी अश्वासन दिले.



            माळशिरस तालुक्यातील कुणबी नोंदीचे दाखले त्वरित देण्यासाठी आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी नूतन प्रांताधिकारी विजया पांगारकर मॅडम व तहसीलदार शेजूळ साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली.लवकरात लवकर कुणबीचे दाखले मिळावेत यासाठी प्रयत्न करावे.असे आवाहन केले.



            यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने,विभागीय कार्याध्यक्ष रविंद्र पवार,मराठा सेवा संघ तालुका उपाध्यक्ष सुदर्शन हंबीरे,सचिव राजेंद्र मिसाळ संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ, रविंद्र पवार,दत्ता मगर, शिवाजीराव लोंढे,जिल्हा उपाध्यक्ष शिवमती मनीषा जाधव,जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा मनोरमा लावंड, अकलूज शहर अध्यक्षा शुभांगी क्षीरसागर,अकलूज शहर कार्याध्यक्ष शारदा चव्हाण,संघटक सुवर्णा क्षीरसागर,संघटक कल्पना चव्हाण,सुवर्णा गोरवे,रंजना लावंड रंजना शिरसट विजया शिंदे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा