उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर साहेब यांची नुकतीच पुणे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी विजया पांगारकर मॅडम यांची नियुक्ती झाली आहे.त्यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांचा आज अकलूज येथे त्यांच्या कार्यालयात मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांचे वतीने शिवधर्म दिनदर्शिका व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळेस मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य इंजिनिअर उत्तमराव माने,बाळासाहेब पराडे, सचिव राजेंद्र मिसाळ शिवाजीराव लोंढे,निलेश चव्हाण जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्य अक्काताई माने,जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्षा मनोरमा लावंड,अकलूज शहर कार्याध्यक्ष शारदा चव्हाण व शुभांगी क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रत्येक पानावर महापुरुषांच्या शिव विवाहाची माहिती दिलेली आहे.
तसेच सर्व महापुरुष यांचे जन्मदिवस मृत्यू दिन इत्यादी माहिती दिली आहे.मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांनी केलेल्या कार्याची माहिती पांगारकर मॅडम यांनी घेतली आणि मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले सदर प्रसंगी माळशिरस तालुक्यात कुणबी प्रमाणपत्र देण्या संदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत देखील पांगारकर मॅडम यांच्याशी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्ते यांनी चर्चा केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा