*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शिवजयंतीच्या निमित्ताने अकलूज मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितीनराव खराडे यांनी दिली.
मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघटना ही मराठा व्यावसायिकांची माळशिरस तालुका स्तरावर कार्यरत असलेली संघटना आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या संघटनेची स्थापना झाली आहे. व्यावसायिक स्तरावरील विविध उपक्रमांसोबतच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य, दरवर्षी दिवाळीला निराधार, गरीब,अनाथ लोकांना कपडे, फराळ आणि साहित्य देऊन सार्थक दिपावली या सारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात ही संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. संघटनेच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. यंदाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष श्री खराडे, उपाध्यक्ष विशाल गोरे, सचिव प्रा धनंजय देशमुख, सहसचिव इंद्रजीत नलवडे, संचालक डॉ. राजीव राणे, डॉ. सुरेश सुर्यवंशी, नितीन इंगवले-देशमुख, नवनाथ अप्पा सावंत, रामचंद्र चव्हाण, गणेश महाडिक, कुंडलिक गायकवाड, विठ्ठल गायकवाड, मनोज गायकवाड, विक्रम माने, जगदीश कदम, योगेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती निमित्त निराधार गरजू महिलांना शिलाईमशीन चे वाटप करण्यात येणार आहे अकलूजच्या विजय चौकात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदात्यांना संयोजकांकडून जगतगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती-शक्ती मुर्ती भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. नातेपुते येथील ज्ञानदीप ब्लड बँकेच्या वतीने हे रक्त संकलित केले जाणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन संघटनेचे सचिव प्रा.धनंजय देशमुख यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा