Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३० मार्च, २०२४

*सरकार बदलल्यावर एकालाही सोडणार नाही! ही माझी गॅरंटी!!-- "राहुल गांधी" यांचा हल्ला*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


आयकर विभागाने नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधी यांनी 'एक्स'वर आपली भूमिका मांडत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या सूडबुद्धीच्या राजकारणाचा समाचार घेतला. यंत्रणा इमानदारीने काम करत असत्या तर असे घडले नसते. त्यांनी विचार केला पाहिजे. कधी ना कधी भाजपचे सरकार जाणारच आहे. मग कशी कारवाई होते ते पाहाच, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. आयकर विभागाने आता नोटीस बजावली. त्याआधी काँग्रेसची चार बँक खातीही गोठवली आहेत. त्यामुळे ऐन निडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी झाली असून खर्च करता येत नसल्याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्यांना अशी अद्दल घडवली जाईल की पुन्हा असे करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही! निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी करणाऱ्या मोदी सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला केला आहे. जेव्हा सरकार बदलेल तेव्हा 'लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यां'वर नक्कीच कारवाई केली जाईल. सरकार बदलल्यावर एकालाही सोडणार नाही, ही माझी गॅरंटी, असा इशारा त्यांनी दिला.


             *साभार*

           *कोकण 24 तास*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा